पाटणकर, सहारिया यांना अवमानना नोटीस

By Admin | Published: March 10, 2017 12:49 AM2017-03-10T00:49:29+5:302017-03-10T00:49:29+5:30

एका प्रकरणात गुरुवारी नागपूर खंडपीठाने नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर व राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना अवमानना नोटीस बजावली आहे.

Contempt Notice to Patankar, Sahariya | पाटणकर, सहारिया यांना अवमानना नोटीस

पाटणकर, सहारिया यांना अवमानना नोटीस

googlenewsNext

नागपूर : एका प्रकरणात गुरुवारी नागपूर खंडपीठाने नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर व राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना अवमानना नोटीस बजावली आहे.
२०१५ मध्ये ब्रजभूषणसिंग बैस व वासुदेव चुटे यांनी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव खुर्द ग्रामपंचायत क्षेत्राचा सालेकसा नगरपरिषद क्षेत्रात समावेश करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या वेळी सरकारी वकिलाने आमगाव खुर्दचा सालेकसा नगरपरिषदेत समावेश करण्याचा निर्णय झाल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेश देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली होती. मात्र शासनाने या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम २० फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात आमगाव खुर्दचा समावेश नाही. परिणामी बैस व चुटे यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत निवडणूक स्थगित ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Contempt Notice to Patankar, Sahariya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.