...हा तर करकरेंचा अवमान

By admin | Published: May 14, 2016 02:47 AM2016-05-14T02:47:31+5:302016-05-14T02:47:31+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना क्लीन चिट देण्याचा प्रकार म्हणजे शहीद हेमंत करकरे यांचा अवमान असून, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करून अशा महत्त्वाच्या खटल्यात ढवळाढवळ करीत

... this is a contempt of tax | ...हा तर करकरेंचा अवमान

...हा तर करकरेंचा अवमान

Next

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना क्लीन चिट देण्याचा प्रकार म्हणजे शहीद हेमंत करकरे यांचा अवमान असून, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करून अशा महत्त्वाच्या खटल्यात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मलिक यांनी म्हटले आहे, की तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी २००८ साली घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करून साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितसह इतर लोकांना अटक केली होती. त्यावेळी या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेसाठी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी व सध्याचे गृहमंत्री हे पंतप्रधानांना साकडे घालत होते. त्यावेळी हेमंत करकरे यांनी या सर्व प्रकरणाचा खुलासा पंतप्रधान कार्यालयासमोर केला होता. करकरे हे या प्रकरणाचा तपास करीत असताना या बॉम्बस्फोटातील आरोपींवर पुष्पवृष्टी करण्याचे काम भाजपाचे लोक करीत होते. केंद्रातील सत्ता आल्यानंतर सध्याच्या एनआयएच्या प्रमुखांना १ वर्षाची मुदतवाढ देत सत्तेचा दुरुपयोग करून या प्रकरणातील आरोपींना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. हे कृत्य म्हणजे या देशातील एक कर्तबगार अधिकारी, जे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले, त्या हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासावर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असून, हा त्यांचा अपमान आहे. सरकारच्या दबावानेच हे कृत्य घडले असून, ते देशाच्या दृष्टीने घातक असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: ... this is a contempt of tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.