श्रीमंत महापालिकेसाठी धनवान उमेदवार स्पर्धेत
By admin | Published: February 18, 2017 08:52 PM2017-02-18T20:52:22+5:302017-02-18T20:52:22+5:30
मुंबई या सर्वांत श्रीमंत महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवारही तेवढेच श्रीमंत आहेत.
Next
>मुंबई, दि. १८ - श्रीमंत महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवारही तेवढेच श्रीमंत आहेत. किमान दीड कोटी ते तब्बल ६८९ कोटींची मालमत्ता असलेला उमेदवारही आपले नशीब अजमावणार आहे. या कोट्यधीशांच्या संपत्तीची चर्चा होत असताना शून्य म्हणजेच उत्पन्नांचे साधन नसलेलेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
मुंबई महापालिका २०१७ साठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यावेळेस २२७५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या उमेदवारांची संपत्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपाचे उमेदवार पराग शाह यांनी ६८९ कोटींची संपत्ती जाहीर केल्याने ते सर्वात पहिले कोट्याधीश ठारले आहेत. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे उमेदवार विनायक पाटील यांनी यांनी ५६ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे.
सर्वाधिक संपत्ती असलेल्या पहिल्या दहाजणांमध्ये शिवसेनेच चार उमेदवार आहेत. त्या नंतर भाजपचे तीन, काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. एकीकडे कोट्याधीश उमेदवार असताना काहीच संपत्ती नसणारे उमेदवारही स्पर्धेत आहेत. सोनाली गायकवाड, सुधीर धामणस्कर, शमीम काद्री सुनंदा कानडे, जयवंत वाघमारे, रुकसाना मेमन, अनिता बुधवंत, भरती सांगळे, पूनम दुर्गवले यांचा समावेश आहे.
उमेदवाराचे नाव पक्ष संपत्ती ( आकडेवारी कोटींमध्ये)
पराग शाह (भाजपा) ६८९
विनायक पाटील ( राष्ट्रवादी) ५६
जयश्री मिस्त्री (शिवसेना) ४४
दीपा पाटील (शिवसेना) ४३
ट्युलिप मिरांडा (काँग्रेस) ४२
राजेश कदम (शिवसेना) ४१
राजेंद्र साळवी (काँग्रेस) ३५
विध्यार्थी सिंह (भाजपा) ३५
हरीश छेडा (भाजप) ३२
स्वाती शीतप (शिवसेना) २६