महापौरपदाचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 04:24 AM2017-02-26T04:24:25+5:302017-02-26T04:24:25+5:30

महापालिकेतील बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने राजकीय समीकरणे जुळविण्याची कसरत सुरू केली असली तरी सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नसल्याचे

Continuation of the mayor's post | महापौरपदाचा घोळ सुरूच

महापौरपदाचा घोळ सुरूच

Next

- गौरीशंकर घाळे, मुंबई

महापालिकेतील बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने राजकीय समीकरणे जुळविण्याची कसरत सुरू केली असली तरी सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नसल्याचे भाजपाने शनिवारी जाहीर केले. तर महापौरपदासाठी शिवसेनेने संपर्क साधला होता. मात्र आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेसने महापौरपदासाठी आम्ही अन्य पक्षांच्या साह्याने आपला उमेदवार उभा करू, असेही संकेत दिले. त्यामुळे महापौरपदासाठीचा घोळ मतदानाच्या तारखेबाबत सुरूच राहण्याची शक्यता दिसत आहे. कोण कोणासोबत जाणार, युती होणार की नवीन राजकीय समीकरण तयार होणार, याचे गूढ वाढले आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित ८४ नगरसेवकांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. या वेळी शिवसेनेला पाठिंबा देणारे चार अपक्ष नगरसेवक असे एकूण ८८ नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. महापौरपदाबाबत या वेळी काही चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापौरपदासाठी संभाव्य युती, आघाडी याविषयी बोलण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला. आज भूमिका ठरवणार नाही. नव्या नगरसेवकांना तांत्रिक बाबींबद्दल मार्गदर्शन करावे लागणार आहे. बरेच जण नवीन आहेत. त्यामुळे पुढच्या काही गोष्टी करताना तांत्रिक चुका होऊ नयेत यासाठी ही बैठक बोलावली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महापौरपदाचे नंतर काय ते बघू, असे उद्धव म्हणाले.
मुंबईत आम्ही क्रमांक एकचा पक्ष आहोत. तेव्हा महापौर आमचाच होईल, असा दावा शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी पुन्हा एकदा केला. मात्र, त्यासाठी शिवसेना कोणाची मदत घेणार यावर त्यांनी मौन बाळगले. शिवसेनेने संपर्क साधला होता, मात्र आम्ही पाठिंबा देण्यास त्यांना स्पष्ट नकार दिला आहे. धर्मनिरपेक्ष व छोट्या पक्षांना घेऊन आम्ही (पान ५ वर)

ठाणेकरांना दंडवत!
युती व आघाडीबाबत नितीन गडकरी, अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता उद्धव यांनी हात जोडत ‘जय महाराष्ट्र’ केला. एवढी घाई का करता, योग्य वेळेला सांगतो, असेही ते म्हणाले. ठाणे महापालिकेत शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांचा शिवसेनेवरचा विश्वास यत्किंचितही कमी झाला नाही उलट यंदा तो वाढला आहे. हे विश्वासाचे नाते दुसरा कुठलाच पक्ष या शहराशी स्थापन करू शकला नाही. ठाणेकरांना माझा साष्टांग दंडवत. मी ठाण्यात लवकरच जाणार आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Continuation of the mayor's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.