सी-सॅट परीक्षेचा प्रश्न न सोडविताच भरती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 04:06 AM2018-12-11T04:06:01+5:302018-12-11T04:06:14+5:30

राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सी-सॅटचा पेपर यूपीएससीप्रमाणे केवळ पात्रतेसाठीच ग्राह्य धरावा, या विद्यार्थ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे

Continued recruitment without question of C-SAT test | सी-सॅट परीक्षेचा प्रश्न न सोडविताच भरती सुरू

सी-सॅट परीक्षेचा प्रश्न न सोडविताच भरती सुरू

Next

पुणे : राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सी-सॅटचा पेपर यूपीएससीप्रमाणे केवळ पात्रतेसाठीच ग्राह्य धरावा, या विद्यार्थ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे; मात्र त्याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वीच महाराष्टÑ लोकसेवा आयोगाकडून ३४२ पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.

महाराष्टÑ लोकसेवा आयोगाकडून पदांची जाहिरात प्रकाशित करण्यापूर्वी सी-सॅटच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत तज्ज्ञांच्या समितीकडून निर्णय घेतला जाईल असे आयोगाचे प्रभारी अध्यक्ष चंद्रशेखर ओक यांनी स्पष्ट केले होते; मात्र त्याबाबतचा कोणताही निर्णय न होताच राज्यसेवेची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

गुणवत्ता यादी तयार करताना सी-सॅट परीक्षेचे गुण धरले जात असल्याने त्याचा इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे, तर कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ही बाब लक्षात आल्यानंतर, त्यांनी सी-सॅट परीक्षेचे गुण केवळ पात्रतेसाठी धरण्यात येतील असा निर्णय घेतला आहे. महाराष्टÑ लोकसेवा आयोगाकडूनही त्याच धर्तीवर सी-सॅट परीक्षेचे गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

सी-सॅटच्या पेपरमध्ये गणित व विज्ञान विषयांच्या प्रश्नांचा भरणा अधिक असतो. त्यामुळे कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या पेपरची काठिण्यपातळी अधिक असते. उतारा सोडविण्यासाठी वेळ अधिक जातो. हा पेपर अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना तुलनेने सोपा जातो. क्लिष्ट प्रश्नांमुळे कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण होत असल्याची तक्रार स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

सर्वांना समान न्याय हवा
परीक्षेसाठी सर्वांना समान संधी व समान न्याय हवा. राज्यसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेमध्ये सी-सॅटचा पेपर इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपा जातो, तर कला व वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो आहे. यूपीएससीप्रमाणे महाराष्टÑ लोकसेवा आयोगानेही ही असमानता तातडीने दूर करणे आवश्यक आहे. राज्यसेवेची जाहिरात प्रकाशित करताना याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे अपेक्षित होते, मात्र आमची निराशा झाली आहे.
- कैलास देशमुख, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

Web Title: Continued recruitment without question of C-SAT test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.