पंचगंगेच्या पातळीत सातत्यानं वाढ
By Admin | Published: August 7, 2016 10:06 PM2016-08-07T22:06:54+5:302016-08-07T22:06:54+5:30
मुसळधार पावसाने पंचगंगा पातळीत सातत्याने वाढ होत असून राजाराम बंधारा येथे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली
कोल्हापूर, दि. 7 - मुसळधार पावसाने पंचगंगा पातळीत सातत्याने वाढ होत असून राजाराम बंधारा येथे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने शहरात सखल भागात पुराचे पाणी आले आहे. शहरातील पूर परिस्थितीची जिल्हाधिकारी अमित सैनी व आयुक्त पी.शिवशंकर यांनी आज पाहणी केली. या पाहणीमध्ये राजाराम बंधारा, शाहूपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, रंकाळा तलाव, कळंबा तलाव यांनी ठिकाणची पाहणी केली.
पुराचे पाणी येत असलेल्या परिसरातील नागरिकांना स्थलांतरीत करणेसाठी सर्व ती तयारी करणेचे आदेश जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी यावेळी संबधीत अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी करवीर प्रांताधिकारी प्रशात पाटील, उपायुक्त विजय खोराटे, तहसिलदार योगेश खरमाटे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, एनटीआरएफचे असि.कमांडट वायरव, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे आदी उपस्थित होते