ठेका धरायला लावणारे नृत्य : फ्लॅश मॉब...
By admin | Published: April 29, 2016 01:10 AM2016-04-29T01:10:16+5:302016-04-29T01:10:16+5:30
डान्स म्हटला की डोळ्यांसमोर स्टेज उभे राहते किंवा डान्सच्या स्पर्धा आपल्याला माहिती असतात.
पुणे : डान्स म्हटला की डोळ्यांसमोर स्टेज उभे राहते किंवा डान्सच्या स्पर्धा आपल्याला माहिती असतात. पण फ्लॅश मॉब डान्स म्हणजे काय, हे अनेक जणांना माहीत नसते. हा डान्स प्रकार काय आहे, याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये ताणलेली असते. फ्लॅश मॉब म्हणजे मॉल्स, शाळा, कॉलेज, गर्दीच्या ठिकाणी एखादा तरुण-तरुणींचा ग्रुप एकत्र येऊन नाचतो आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम या माध्यमातून करीत असतो. यामध्ये कोणत्याही वयाची अट नसते.
आजकाल विविध डान्स स्पर्धा तरुणांना आकर्षित करीत असतात. सध्या सुरू असलेल्या डान्स रिअॅलिटी शोला मिळत असलेली प्रसिद्धी यामुळे नृत्यक्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. यामुळे विविध नृत्यप्रकार अनुभवायला, शिकायला मिळत आहेत. यासाठी तरुण-तरुणाई सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसते. कारण एखाद्या डान्सची स्टेप आपल्याला शिकायची असेल तर यू ट्यूबवर डान्स व्हीडीओ पाहून ती करता येते. त्यामुळे या भावनेवर आधारित फ्लॅश मॉब या डान्स संकल्पनेची रुजवण झालेली दिसून येत आहे.
फ्लॅश मॉब म्हणजे एका ठिकाणी समूह करून लयबद्ध पद्धतीने नाचणे. यामध्ये वयाच्या कोणत्याही अटीचे बंधन नसते. त्यामुळे आता पुण्यामध्ये काही मॉल्समध्ये फ्लॅश मॉब हा डान्स प्रकार लोकांना आकर्षित करताना दिसत आहे. यामध्ये तरुण-तरुणी ग्रुप करून गाणी लावून नाचतात यामध्ये कोणालाही सहभागी होता येते. या डान्स प्रकारामध्ये मोठ्या गर्दीच्या ठिकाणी शंभरएक जणांचा ग्रुप गाणी लावून नाचायला लागतात. अनेक जण त्याकडे कुतूहलाने पाहतात तर काहींना हा वेडेपणादेखील वाटतो. पण ज्यांना ही संकल्पना माहिती आहे ते या यामध्ये सहभागी होऊन डान्स करतात. या डान्समधून एखाद्या वस्तूंची ब्रँडिंग करायची असेल तीसुद्धा े करता येते. आठ-दहा वर्षांपूर्वी सर्वांच्या कानावर पडलेला शब्द म्हणजे फ्लॅश मॉब आहे. काहींना हा नृत्यप्रकार माहिती नसेल असा प्रश्न पडतो, की फ्लॅश मॉब म्हणजे आहे तरी काय? थोडक्यात कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी हा डान्स एकत्र येऊन लोक करतात. म्हणतात ना, नृत्यातून अनेक भावना व्यक्त करता येतात. जनजागृतीसाठी या नृत्यप्रकारची सध्या बाजारात चलती आहे.
फ्लॅश मॉब हा डान्स प्रकार लोकांमध्ये पोहचण्याचे चांगले माध्यम झाले आहे. वृत्तपत्र, रेडिओ, टीव्ही यामधून लोकांपर्यंत एखाद्या गोष्टीची जनजागृती तर होतेच पण ती जर डान्सच्या माध्यमातून होत असेल तर लोकांचे मनोरंजनही होते. ज्यांना आवड आहे त्यांना डान्सही करता येतो, अनेक गोष्टी पोहचतात. त्यामुळे फ्लॅश मॉब हा नृत्यप्रकार आज लोकांना जास्त जवळचा वाटत आहे.
- मानसी कानिटकर,
डान्स कोरिओग्राफर