कंत्राटी अभियंत्यास लाच स्वीकारताना अटक
By admin | Published: March 22, 2017 02:13 AM2017-03-22T02:13:27+5:302017-03-22T02:13:27+5:30
व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना येथील विक्रीकर कार्यालयातील कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली.
खामगाव, दि. २१- व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना येथील विक्रीकर कार्यालयातील कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली.
चिखली तालुक्यातील किन्ही सवडत येथील विवेकानंद ज्ञानदेव बराटे (३८) यांनी विक्रीकर कार्यालय खामगाव येथील कंत्राटी अभियंता वैभव सुभाष आमले हे व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याबाबत मंगळवारी एसीबीकडे तक्रार दिली. या तक्रारीची तातडीने दखल घेत एसीबीच्या पथकाने विक्रीकर कार्यालयात साफळा रचला. दरम्यान कंत्राटी अंभियंता वैभव आमले १५00 रूपये लाचेची रकम स्वीकारत असताना त्याला एसीबीच्या पथकाने अटक केली.