ठेकेदार-अभियंत्याच्या नाकर्तेपणा
By admin | Published: September 21, 2015 01:23 AM2015-09-21T01:23:49+5:302015-09-21T01:23:49+5:30
मुरबाड तालुक्यातील माळ, मोरोशी, खुटल येथे सहा वर्षांपूर्वी एक कोटी वीस लाख खर्च करून बांधलेल्या आश्रमशाळांसह वसतिगृहाचे बांधकाम अर्धवट असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे.
टोकावडे : मुरबाड तालुक्यातील माळ, मोरोशी, खुटल येथे सहा वर्षांपूर्वी एक कोटी वीस लाख खर्च करून बांधलेल्या आश्रमशाळांसह वसतिगृहाचे बांधकाम अर्धवट असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे.
या तिन्ही आश्रमशाळांत विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली. येथे मुलामुलींसाठी स्वतंत्र निवासाची सोय केलेली आहे. मात्र, दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने व पूर्वीचे वसतिगृह अपूर्ण पडत असल्याने शासनाने २००९ मध्ये प्रत्येकी ४० लाख असा १ कोटी २० लाखांचा निधी या तीन आश्रमशाळांत स्वतंत्र वसतिगृह बांधण्यास मंजुरी देऊन निविदा काढून कामाला सुरुवात केली. या तीनही ठिकाणी वेगवेगळ्या तीन ठेकेदारांनी बांधकाम केले. परंतु, त्यांनी बांधकाम अर्धवट ठेवून रक्कम मात्र संपूर्ण काढली. आज या तिन्ही इमारतींचे प्लॅस्टर, लादी, विद्युतीकरण, खिडक्या, दरवाजे अशी अनेक कामे अपूर्ण असताना तत्कालीन अभियंत्याशी संगनमताने आलेला निधी काढला आहे.