कंत्रटी कामगार कायम
By admin | Published: August 8, 2014 11:58 PM2014-08-08T23:58:24+5:302014-08-08T23:58:24+5:30
महापालिकेच्या सर्व विभागातील कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा ठराव महासभेने आज मंजूर केला आहे.
Next
>नवी मुंबई : महापालिकेच्या सर्व विभागातील कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा ठराव महासभेने आज मंजूर केला आहे. जवळपास 9500 कंत्रटी कामगारांना याचा लाभ होणार असून हा ठराव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
सभागृहनेते अनंत सुतार यांनी महापालिकेच्या कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा अशासकीय ठराव महासभेपुढे मांडला. त्यामध्ये कायम कामगारांप्रमाणोच या कंत्रटी कामगारांना देखिल सुविधा मिळाव्यात अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. महापौर सागर नाईक यांनी सर्वमताने हा अशासकीय ठराव मंजूर केला. या निर्णयाचा लाभ महापालिकेच्या सर्वच विभागातील सुमारे 9 हजार 5क्क् कंत्रटी कामगारांना होणार आहे. शासनाकडे हा ठराव पाठवल्यानंतर पालकमंत्री गणोश नाईक हे शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे महापौर सागर नाईक यांनी सांगितले. तर कंत्रटी कामगारांना कायम करत असताना त्यांना गणवेश वाटपासाठी पगाराव्यतिरिक्त स्वत्रंत्र व्यवस्था केली जाणार आहे. तर या कामगारांच्या कुटुंबीयांनाही कायम कामगाराप्रमाणोच वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळणार असल्याचेही महापौर सागर नाईक यांनी सांगितले.
मात्र यावेळी कामगारांच्या हिताचा ठराव आणण्यास सत्ताधा:यांना झालेल्या विलंबावरुन विरोधकांनी धारेवर धरले. तर हा घेतलेला निर्णय पूर्णत्वास न्या अन्यथा आपच्या केजरीवाल यांच्यासारखी परिस्थिती होईल असा टोला नगरसेवक नामदेव भगत यांनी सत्ताधा:यांना मारला. यावेळी कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा हा ठराव आयुक्तांमार्फत शासकीय ठराव येणो आवश्यक होते असे नगरसेवक विठ्ठल मोरे म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या एक महिना अगोदर हा निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री गणोश नाईक यांच्या निर्णयाचे अभिनंदनही केले. तसेच आचारसंहिते पूर्वीच हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे जाणो आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कामगारांच्या हिताचा हा निर्णय घेत असताना त्यांना महापालिकेमार्फत घरेही देणो गरजेचे असल्याचे ते म्हणाले.विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनीही या ठरावाची अंमलबजावणी लवकरात लवकर होणो गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
4महापालिका आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी यावेळी सांगितले की पदनिर्मीती व भरती सेवा निर्मीती याचा प्रशासनास अभ्यास करावा लागणार आहे. या संदर्भात शासनाकडे चर्चा सुरू आहे. प्रशासनाची भुमीका ही कामगार किंवा प्रस्ताव कोणाच्या विरोधात नसणार आहे. सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल असे सांगितले.
कामगारांच्या सेवेची पोचपावती
4पालिकेच्या सेवेत कार्यरत असणा:या कर्मचा:यांना कायम करण्याचा निर्णय हा आनंदाचा क्षण आहे. कामगारांनी दिलेल्या योगदानाची पोचपावती त्यांना देण्यात आली आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्याला मंजूरी मिळेल असा विश्वास असल्याचे मत महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केले आहे.
कामगार संघटनांकडून स्वागत
4नवी मुंबई म्युनीसीपल मजदूर युनियनचे सरचिटणीस अॅड. सुरेश ठाकूर यांनी सांगितले की या निर्णयामुळे कामगारांच्या आतार्पयतच्या लढय़ास यश आले आहे.
4अशा प्रकारे निर्णय घेणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. समाज समता कामगार संघाचे सरचिटणीस मंगेश लाड यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.