दिवाळी एक्स्प्रेसवर दलालांचा ताबा

By admin | Published: September 7, 2014 12:52 AM2014-09-07T00:52:35+5:302014-09-07T00:52:35+5:30

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. दूरवर नोकरीनिमित्त गेलेले चाकरमाने, विद्यार्थी या सणाला आपल्या घराकडे परततात. यामुळे या दिवसात रेल्वेगाड्या फुल्ल होतात. परंतु दिवाळीला अजून थोडाच

The control of the brokers on the Diwali Express | दिवाळी एक्स्प्रेसवर दलालांचा ताबा

दिवाळी एक्स्प्रेसवर दलालांचा ताबा

Next

रेल्वे आरक्षण फुल्ल : प्रतीक्षा यादी ९०० वर
दयानंद पाईकराव - नागपूर
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. दूरवर नोकरीनिमित्त गेलेले चाकरमाने, विद्यार्थी या सणाला आपल्या घराकडे परततात. यामुळे या दिवसात रेल्वेगाड्या फुल्ल होतात. परंतु दिवाळीला अजून थोडाच अवधी असताना आताच दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यातील आरक्षण फुल्ल झाले आहे. सर्वच रेल्वेगाड्यांचा ताबा दलालांनी घेतल्यामुळे प्रतीक्षा यादी (वेटींग) ९०० च्या वर पोहोचले आहे. यामुळे आता दिवाळीत प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट तिकिटाचे शुल्क भरून महागड्या खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याची पाळी येणार आहे.
दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याला प्राधान्य देतात. यामुळे या काळात खाजगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याची स्थिती असते. एरव्ही ७०० ते ९०० रुपयांना मिळणारे ट्रॅव्हल्सचे तिकीट दिवाळीच्या काळात २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांवर पोहोचते. प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि फायदेशीर माध्यम म्हणून असंख्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात.
प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन दिवाळीतील सर्व आरक्षित तिकिटांवर दलालांनी ताबा मिळविल्याची स्थिती आहे. दिवाळीच्या काळात नागपुरातून मुंबई, पुणे, दिल्ली आणि बहुतांश शहरात जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचे ‘वेटिंग’ ९०० पर्यंत पोहोचले आहे.
दिवाळीला कमी अवधी असताना आताच आरक्षणाची ही स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ताण पडणार हे निश्चित झाले आहे. नागपुरातून पुण्याला जाणाऱ्या १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये २५ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ४५२, थर्ड एसीत २९० वेटिंग आहे.
२७ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ९०६ तर थर्ड एसीत २९८, २९ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये २२९, थर्ड एसीत ७४ तसेच १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १८६, थर्ड एसीत ७४ एवढी प्रतीक्षा यादी आहे. बिलासपूर-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ७७, थर्ड एसीत ३६, २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १११ आणि थर्ड एसीत ३३ वेटिंग आहे. १२११४ नागपूर-पुणे गरिबरथ एक्स्प्रेसमध्ये २४ आॅक्टोबरला ६६ वेटिंग, २६ आॅक्टोबरला ९२५, २८ आॅक्टोबरला ५५३, ३१ आॅक्टोबरला ८१ आणि २ नोव्हेंबरला ५० वेटिंग आहे.
मुंबई, दिल्ली मार्गावरसुद्धा हीच स्थिती
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यात १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये २४ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ४२, थर्ड एसीत ७, २५ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ४२, थर्ड एसीत ७, १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये २२, थर्ड एसीत १९, २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ३०, थर्ड एसीत १८ वेटींग आहे. दुरांतो एक्स्प्रेस आणि सेवाग्राममध्येही वेटींग ५० ते ३०० पर्यंत पोहोचले आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यातही सर्व गाड्या ८ ते ६० पर्यंत वेटींगवर पोहोचल्या आहेत. याशिवाय इतर महत्त्वाच्या शहरात नागपूरातून जाणाऱ्या गाड्यांची हीच स्थिती असल्याचे आढळले. यामुळे प्रवाशांच्या खिशाला दिवाळीत ताण पडून त्यांना अधिकची रक्कम मोजून प्रवास करण्याची पाळी येणार आहे.

Web Title: The control of the brokers on the Diwali Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.