जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण आणा
By Admin | Published: October 20, 2015 01:50 AM2015-10-20T01:50:31+5:302015-10-20T01:50:31+5:30
गेल्या काही दिवसांपासून तूरडाळ, उडीदडाळ आणि कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदिन आहारात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या किंमतीवर नियंत्रण आणावे, असे निवेदन
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तूरडाळ, उडीदडाळ आणि कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदिन आहारात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या किंमतीवर नियंत्रण आणावे, असे निवेदन मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून दिले.
तूरडाळीची किंमत २०० रुपये किलोपर्यंत पोहचली आहे. इतकी महागाई वाढत राहिल्यास सामान्य माणसांना जगणे मुश्किल होईल. किंमतीना वेळीच आळा घातला पाहिजे. कांदा, तूरडाळ आणि उडीद डाळीच्या किंमती राज्य सरकारने हस्तक्षेप करुन कमी कराव्यात, असे निवेदन राज्यपालांना दिले.
नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला योजना आखण्यास सांगितल्या आहेत. त्यात, किंमत नियंत्रण कक्षाची स्थापना करावी, साठवणीवर निर्बंध आणावेत असे सांगितले आहे. परंतु, राज्य सरकारने गेल्या चार ते पाच महिन्यांत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तूरडाळ, उडीद डाळीची किती आवश्यकता आहे, याबद्दल राज्य सरकारने केंद्राला कळवले नाही.
कांदे २० रुपये किलो तर,
तूरडाळ ६७ रुपये उडीद डाळ ७७ रुपये प्रतिकिलो, इतकी
करावी असे पंचायतीचे सरचिटणीस अॅड. शिरीष देशपांडे यांनी
सांगितले. किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तत्काळ उपाय करावेत, किंमती स्थिर ठेवण्यासाठी योजना आखाव्यात, असे वर्षा राऊन यांनी सांगितले.