प्रत्युषा प्रकरणी राहुल राज विरुद्ध गुन्हा

By admin | Published: April 6, 2016 05:01 AM2016-04-06T05:01:53+5:302016-04-06T05:01:53+5:30

बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राहुल प्रत्युषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

Controversial case against Rahul Raj | प्रत्युषा प्रकरणी राहुल राज विरुद्ध गुन्हा

प्रत्युषा प्रकरणी राहुल राज विरुद्ध गुन्हा

Next

मुंबई : बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राहुल प्रत्युषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्युषाचे अजूनही माजी प्रियकरांसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन राहुल तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे प्रत्युषाने तिच्या काकूला सांगितले होते. ही बाब प्रत्युषाच्या आईला कळल्यावर त्यांनी मंगळवारी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन बांगुरनगर पोलिसांनी राहुलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अंबरनाथमध्ये प्रत्युषाचे काका दिपांकर बॅनर्र्जी आणि काकू बर्नाली बॅनर्जी राहतात. जानेवारी ते मार्च या दरम्यान प्रत्युषाने तीन वेळा काकींची भेट घेतली होती. त्यावेळी राहुल तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याबाबत तिने काकूला सांगितले होते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली असल्याचे काकूचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी प्रत्युषाच्या आईला (सोमा बॅनर्जी) सांगितले होते.
मंगळवारी सोमा बॅनर्जी यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रियकर राहुल राज सिंगविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक तसेच शारीरिक छळ करणे, शिविगाळ करणे, मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी वर्तवली आहे.
>लाईफ ईज वेरी डिफिकल्ट पापा
च्प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंग याच्याविरुद्ध बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आईच्या भावानांचाही बांध फुटला. राहुलने आम्हालाही प्रत्युषापासून दूर केला असल्याचा आरोप प्रत्युषाच्या आईने केला आहे. त्यात आत्महत्येच्या तीन दिवसापूर्वीच प्रत्युषाने वडीलांकडे आपले दुख मांडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिने’लाईफ इज वेरी डिफिकल्ट पापा’ असे तिने वडिलांना सांगितले होते.
च्सोमा बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने नेहमी आम्हाला प्रत्युषापासून दुर ठेवले. आम्ही रांचीचे बाहुबली असून माझ्याकडे खूप पैसा असल्याचे त्याने प्रत्युषाला सांगितले होते. आम्ही त्याच्याबाबत जास्त चौकशी करत असल्याने त्याने आम्हाला नेहमी तिच्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही राहुलच्या कुटुंबीयांना कधीच भेटलो नाही. प्रत्युषानेही तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत काहीच सांगितले नाही. ३० मार्च रोजी जेव्हा प्रत्युषासोबत तिच्या वडिलांशी बोलणे झाले तेव्हा ती फार दु:खी वाटत होती. कामाच्या ताण असेल म्हणून आम्ही तिची समजूत काढली. तेव्हाच जर प्रत्युषाने आम्हाला सांगितले असते तर ही वेळच आली नसती असेही बॅनर्जी यांनी सांगितले.

Web Title: Controversial case against Rahul Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.