वादग्रस्त ‘राधे माँ’ला शाही स्नानास मज्जाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2015 02:16 AM2015-08-06T02:16:48+5:302015-08-06T02:16:48+5:30
नाशिकच्या सिंहस्थ-कुंभमेळ््याच्या पहिल्या शाही स्नानाची तारीख जवळ येत असताना रोज नवे वाद उभे राहत आहेत. बुधवारी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी
त्र्यंबकेश्वर : नाशिकच्या सिंहस्थ-कुंभमेळ््याच्या पहिल्या शाही स्नानाची तारीख जवळ येत असताना रोज नवे वाद उभे राहत आहेत. बुधवारी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साध्वी त्रिकाल भवंता, मुंबईतील वादग्रस्त राधे माँ आणि महामंडलेश्वर सच्चिदानंद यांना शाही स्नानाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधितांनी सर्वसामान्य नागरिक म्हणून स्नान करावे, असे स्वरूपानंद सरस्वती म्हणाले. अ. भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र्रगिरी यांनी शंकराचार्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविली. पर्वणीच्या दिवशी शाहीस्नानाला जाण्याचा अधिकार केवळ आखाड्यांनाच असल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी महाराष्ट्र हेच आमचे मुख्य क्षेत्र आहे. सौराष्ट्र, महाराष्ट्र हीच आमची भूमी आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राबाहेर का जावे व आम्हाला महाराष्ट्राबाहेर काढणारे हे कोण?, असा सवाल केला. ते म्हणाले, चार पिठांच्या क्षेत्रात जे आचार्य आहेत तेच शंकराचार्य. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्यासमवेत असणाऱ्या आचार्यांना उत्तराधिकारी म्हणून दीक्षा दिली होती. नाशिकचा कुंभमेळा महंत ग्यानदास किंवा साध्वी भवंता यांच्याभोवती केंद्रित होण्याऐवजी तो धर्माचा प्रसार तसेच आध्यात्मिकतेचा जागर यावर प्रकाश टाकणारा ठरला पाहिजे, असे स्वरूपानंद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)