नवरा बायकोचा वाद सोशल मीडियातून आला चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 12:45 PM2019-05-20T12:45:14+5:302019-05-20T13:22:24+5:30

पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांवर केले जाणारे आरोप, मोबाईलवर झालेल्या संभाषणाच्या क्लिप, स्क्रीन शॉट हे बिनधास्तपणे आपआपल्या फेसबुक च्या अकाऊंटवर शेयर केले जात आहे.

controversy between husband -wife comes on social media | नवरा बायकोचा वाद सोशल मीडियातून आला चव्हाट्यावर

नवरा बायकोचा वाद सोशल मीडियातून आला चव्हाट्यावर

Next
ठळक मुद्देएकमेकांच्या मुलभूत अधिकाराचा आदर महत्वाचा : दोषांवर जाहीरपणे केली जातेय चर्चा‘इन्स्टंट ग्रँटिफिकेशन’ मधून होतात टोकाचे आरोप 

- युगंधर ताजणे - 
पुणे : राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या तऱ्हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा-बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे. एकमेकांवर केले जाणारे आरोप, मोबाईलवर झालेल्या संभाषणाच्या क्लिप, स्क्रीन शॉट हे बिनधास्तपणे आपआपल्या फेसबुक च्या अकाऊंटवर शेयर केले जात आहे. प्रियकर- प्रेयसीमधील बेबनाव देखील व्हाटसअप ‘डीपी’तून सगळयांसमोर येऊ लागला आहे. यामुळे घरातील भांडण थेट सोशल मीडियातून चव्हाट्यावर आले आहे. 
   आपल्याबद्द्ल लोकांच्या मनात आपुलकी, सहानुभुती, प्रेम तयार व्हावे यासाठी सातत्यपूर्वक अनेकजण एकमेकांवर भांडणाचे उट्टे सोशल मीडियावर काढतात. याशिवाय काही केल्या स्वत:चे अस्तित्व सिध्द करणे ही दोघांकरिता अस्मितेची बाब होऊन बसत असल्याने सामाजिक माध्यमांवर पती-पत्नीबरोबरच जोडप्यांची भांडणे होत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना भगिनी हेल्पलाईनच्या प्रमुख व अ‍ॅड. सुप्रिया कोठारी यांनी सांगितले, ज्या पध्दतीने सध्या सोशल माध्यमांवर नवरा बायकोची एकमेकांची उणी-दुणी काढताना दिसतात. त्यावर एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. ते म्हणजे पूर्वी नवरा असेल किंवा बायको यांना एकमेकांची माहिती काढणे तितकेसे सोपे नव्हते. सोशल माध्यमातून ती मिळवणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे अनेकदा पती पत्नी कोर्टात एकमेकांवरील आरोप सिध्द करण्याकरिता अशाप्रकारचे आरोप समाजमाध्यमांवर प्रसिध्द करतात. दुसऱ्या बाजुला भावनिक आधार शोधण्याकरिता तसेच आपल्यांवरील अत्याचारांबाबत सहानभुती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टस फेसबुकवर शेयर करताना दिसतात. 

‘इन्स्टंट ग्रँटिफिकेशन’ मधून होतात टोकाचे आरोप 
घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा भंग आपल्याकडून होतो असे नवरा बायको किंवा प्रियकर प्रियसीच्या लक्षात येत नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी समोरच्याला देखील आपली मते योग्यरीत्या व्यक्त करण्याचा अधिकार सोयीस्करपणे दोघांना पडत असल्याचे चित्र सोशल माध्यमांवर पाहवयास मिळते. तसेच प्रिन्सिपल आॅफ नँचरल जस्टीस आणि राईट टू हिअर्ड नुसार दुसºया व्यक्तीचे मत विचारात घेणे जरुरीचे आहे. मात्र अनेकदा फेसबुक, व्हाटसअप, इन्स्टाग्राम, टिव्टटरवरुन एकमेकांवर आरोप करुन बदनामी करण्यात आनंद मानला जातो. आपल्याला न्याय मिळावा याकरिता कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी नसल्यानेच ‘इन्स्टंट ग्रँटिफिकेशन’ मधून टोकाचे आरोप केले जातात. 


सोशल मीडियावर हल्ली मोठ्या प्रमाणात नवरा बायको यांच्यातील भांडणाचे पडसाद उमटताना दिसतात. या माध्यमांवर मुळातच सर्वांना फ्री अक्सेस असल्याने त्यावर कुणालाही आपल्या मतानुसार व्यक्त होण्यास वाव आहे. मात्र यामुळे आपण कशापध्दतीने व्यक्त होतो याचे भान पती पत्नी यांना राहत नाही. केवळ पती पत्नीच नव्हे तर प्रियकर-प्रियसी देखील वेगवेगळया समाजमाध्यमातून भांडत आहेत. संपत चाललेली सहनशक्ती आणि तात्काळ हवे असणारे समाधान यातून रागाला मोकळी वाट करुन देण्याकरिता तरुण पिढी सोशल माध्यमांच्या आहारी जात आहेत. जी गोष्ट संवादातून मिटवली जाऊ शकते ती भांडणातून जगासमोर मांडण्याची क्रेझ वाढत चालली आहे. 
- अ‍ॅड. डॉ. चिन्मय भोसले, क्रिमिनल आणि सायबर लॉ तज्ज्ञ

Web Title: controversy between husband -wife comes on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.