पक्ष प्रवेशावरून भाजपामध्ये मतभेद

By admin | Published: May 15, 2017 06:26 AM2017-05-15T06:26:27+5:302017-05-15T06:26:27+5:30

मिरजेतील अन्य पक्षांतून भाजपामध्ये येऊ पाहणाऱ्या नेत्यांच्या प्रवेशाबद्दल मतभेद निर्माण झाले आहेत. प्रस्थापित व प्रतिमा मलिन झालेल्या लोकांना पक्षात घेऊ नये

Controversy in BJP over party entry | पक्ष प्रवेशावरून भाजपामध्ये मतभेद

पक्ष प्रवेशावरून भाजपामध्ये मतभेद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेतील अन्य पक्षांतून भाजपामध्ये येऊ पाहणाऱ्या नेत्यांच्या प्रवेशाबद्दल मतभेद निर्माण झाले आहेत. प्रस्थापित व प्रतिमा मलिन झालेल्या लोकांना पक्षात घेऊ नये, असे जुन्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर काहींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असलेला दुसरा मतप्रवाहसुद्धा दिसत आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्ह्यात दीडशेहून अधिक लोक प्रवेशाकरिता इच्छुक असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. सर्वच तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असली तरी, सध्या मिरजेतील काही नेत्यांच्या पक्ष प्रवेशावरून मतभेद निर्माण झाले आहेत. सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. पक्ष प्रवेशाचाही डंका पिटला जात आहे.
काही पदाधिकाऱ्यांच्या मते प्रस्थापित लोकांनाच भाजपामध्ये घेऊन त्यांना तिकीट वाटप
केल्यास तरुण कार्यकर्ते आणि
जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढू शकते. त्याशिवाय नागरिकांमध्येही चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे पक्षप्रवेश घेताना प्रत्येक नेत्याची पार्श्वभूमी तपासावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Controversy in BJP over party entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.