सपा नेत्याच्या मुक्ताफळाने वाद

By admin | Published: June 5, 2014 12:15 AM2014-06-05T00:15:55+5:302014-06-05T00:15:55+5:30

अखिलेश यादव सरकारवर चौफेर टीकेचा मारा सुरू असतानाच समाजवादी पार्टीच्या एका नेत्याने यासंदर्भात आगळावेगळा युक्तिवाद करून त्यात आणखी तेल ओतले आहे.

Controversy over SP's leader's confession | सपा नेत्याच्या मुक्ताफळाने वाद

सपा नेत्याच्या मुक्ताफळाने वाद

Next

 बदायूँ : विचित्र युक्तिवादाने यूपीच्या अखिलेश सरकारवर नामुष्की

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात बलात्काराच्या वाढत्या घटनांवरून अखिलेश यादव सरकारवर चौफेर टीकेचा मारा सुरू असतानाच समाजवादी पार्टीच्या एका नेत्याने यासंदर्भात आगळावेगळा युक्तिवाद करून त्यात आणखी तेल ओतले आहे. बरेचदा तरुण-तरुणींमधील संबंध उघडकीस आल्यानंतर त्याला बलात्काराचे नाव दिले जाते, असे या नेतेमहाशयांचे म्हणणो आहे. 
सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी या घटनांमागील कारणमीमांसा करताना हा विचित्र तर्क लावला आहे. सपा सुप्रीमो मुलायमसिंग यादव यांनीही गेल्या महिन्यातच ‘ते तरुण आहेत. चुका होत असतात. याचा अर्थ आपण त्यांना फासावर लटकवायचे असे नाही’ असे विधान करून वाद ओढवून घेतला होता. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
राष्ट्रपती राजवटीसाठी ‘फिट केस’- आर.के. सिंग
4 उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ही पूर्णपणो अपयशी ठरल्याने हे राज्य राष्ट्रपती राजवट लागू करण्यास एक ‘फिट केस’ असल्याचे मत भाजपा खासदार व माजी गृहसचिव आर.के. सिंग यांनी व्यक्त केले आहे. 
4पत्रकारांशी बोलताना त्यांनी, हे राज्य एक अपयशी राज्य आहे. येथे कायद्याचा धाक नाही, बलात्कार व खून या गोष्टी राजरोस घडत आहेत, कसलेच नियंत्रण नाही त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हे राज्य अगदी योग्य आहे असे मत मांडले. 
4दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी उत्तर प्रदेशातील ियांवर होणारे अत्याचार ही गृहमंत्रलयासाठी चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे.
 
अमेरिका भयभीत
4वॉशिंग्टन : भारतातील महिलांवर होणारा लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांनी आपण भयभीत झालो असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. बदायूँ प्रकरणावर अमेरिकी परराष्ट्र मंत्रलयाने चिंता व्यक्त केली.
 
 
युनोप्रमुख स्तंभित
4संयुक्त राष्ट्रसंघ : बदायूँ प्रकरणाने संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून स्तंभित झाले आहेत. लैंगिक हिंसाचाराविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 

Web Title: Controversy over SP's leader's confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.