आंबोलीतील जंगल सफारीसाठी नियमावली

By admin | Published: November 27, 2015 11:24 PM2015-11-27T23:24:11+5:302015-11-28T00:16:05+5:30

तिकीटही आकारण्याचा विचार : स्थानिकांच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याचे काम सुरू

Conventions for the Ambulal Jungle Safari | आंबोलीतील जंगल सफारीसाठी नियमावली

आंबोलीतील जंगल सफारीसाठी नियमावली

Next

अनंत जाधव -- सावंतवाडी-आंबोलीतील वन्यप्राण्यांची तसेच वनौषधींची जंगल सफारीच्या निमित्ताने तस्करी होऊ नये तसेच सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांपासून वन्यप्राणी तसेच वनौषधींना धोका पोहोचू नये, यासाठी वनविभाग स्थानिक वनसंरक्षक समितीच्या माध्यमातून नियमावली तयार करणार आहे. तसेच जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना तिकीटही आकारले जाणार आहे. याचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या वनक्षेत्रपालांच्या स्तरावर सुरू आहे. तो लवकरच अंतिम मंजुरीसाठी उपवनसंरक्षकाकडे पाठविणार आहेत.आंबोलीत पावसाळी, उन्हाळी आणि हिवाळी अशा तीन टप्प्यांत पर्यटन सफर असते. पर्यटकांचा जंगल सफर हा आवडीचा विषय आहे. आंबोलीच्या जंगलात रात्रीची सफर करीत असताना पर्यटकांना विविध प्रकारचे साप तसेच प्राणी आढळतात. त्यांचे योग्यप्रकारे संवर्धन होणे गरजेचे असते, तर सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वनौषधी वनस्पती आहेत. पूर्वीच्या काळी आंबोलीतून नरक्या या वनस्पतीची तस्करी होत असे. त्यानंतर त्याच्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळेच वनविभागाने वाढत्या पर्यटनामुळे येथील निसर्गाला कोणताही धोका उद्भवू नये, यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर वनविभाग मलबार नेचर संस्था तसेच वनसंरक्षक समिती मिळून जंगल सफर करणाऱ्या पर्यटकांसाठी नियमावली तयार करणार आहेत. यामध्ये पर्यटकांनी धूम्रपान करून जंगलात जाऊ नये, सिगारेट, माचिस आदी वस्तंूना बंदी घालण्यात येणार आहे. तसेच एखाद्या प्राण्याचा फोटो काढत असताना किती अंतरावरून तो फोटो काढला जावा, आदींचा समावेश असणार आहे.त्याशिवाय आंबोलीत जंगल सफारीसाठी येणारे पर्यटक लक्षात घेऊन या जंगल सफारीसाठी तिकीट ठेवण्याचाही मानस वनविभागाचा आहे. केंद्र सरकारचा प्रत्येक सह्याद्रीच्या पट्ट्यात वनाच्या संरक्षणासाठी नेमलेल्या समितीकडे हे अधिकार देण्याचा विचार आहे. यासाठी खास सफारीच्या एन्ट्रीलाच छोटीशी चौकी उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये वनसंरक्षक समितीचा एक सदस्य नेहमी ठेवला जाणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम आंबोली वनविभागाचे अधिकारी करीत आहेत. हा आराखडा मंजुरीसाठी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

प्राणी, वनस्पती यांचे संरक्षण झाले पाहिजे : गावकर
याबाबत वनविभागाचे आंबोलीतील वनक्षेत्रपाल संभाजी गावकर म्हणाले, वाढती जंगल सफर तसेच प्राणी आणि वनस्पती यांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक पातळीवर संस्था व वनसंरक्षक समिती यांच्या मदतीने ही नियमावली तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रथम चर्चा करणार आहे.

Web Title: Conventions for the Ambulal Jungle Safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.