मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ

By Admin | Published: January 16, 2017 06:21 AM2017-01-16T06:21:45+5:302017-01-16T06:21:45+5:30

मुंबई विद्यापीठाचा १६० वार्षिक पदवी प्रदान सोहळा सोमवार, १६ जानेवारीला होणार

Convocation of University of Mumbai | मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ

मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ

googlenewsNext


मुंबई : मुंबई विद्यापीठाचा १६० वार्षिक पदवी प्रदान सोहळा सोमवार, १६ जानेवारीला होणार असून, यात १ लाख ६१ हजार १७३ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत, तर ३२६ स्नातकांना पीएच.डी आणि एमफिल पदव्या बहाल करण्यात येणार असून, ५८ जणांना सुवर्ण पदके देण्यात येणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि उद्योगपती मुकेश अंबानी या पदवी दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात ७३ हजार ७९५ विद्यार्थी स्नातकांना आणि ८७ हजार ३७८ विद्यार्थिनी स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. कला शाखेतील १३०, ललितकला विद्याशाखा २, वाणिज्य २१, विधी २, तंत्रशास्त्र २२ आणि विज्ञान १४५ अशा ३२४ स्नातकांना विद्यावाचस्पती (पीएच.डी) आणि एमफिल पदव्या प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या ४९ विद्यार्थ्यांना ५८ पदके बहाल करण्यात येणार आहेत. यात ५६ सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.
दोन कुलपती पारितोषिक आणि एक कुलपती पदक बहाल करण्यात येणार आहे.
डिजिटल इंडियांतर्गत पहिल्यांदाचा डिजिटल लॉकरच्या माध्यमातून गुणपत्रिका मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड केल्यावर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाचे १६० वे वर्ष असल्याने, गुणपत्रिकेवर आणि प्रमाणपत्रावर विशेष लोगो छापण्यात आला
आहे. (प्रतिनिधी)
>मोबाइलवरही प्रत मिळणार
या वर्षी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर पहिल्यांदाच ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ छापण्यात आला आहे. या कोडच्या आधारे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राच्या मूळ पत्रिकेबरोबर मोबाइलवरही प्रत उपलब्ध होणार आहे.

Web Title: Convocation of University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.