प्राथमिक शाळेत कुकरचा स्फोट
By admin | Published: June 19, 2016 12:36 AM2016-06-19T00:36:28+5:302016-06-19T00:36:28+5:30
निमोण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार शिजविताना कुकरचा स्फोट होऊन स्वयंपाकी महिला गंभीररित्या भाजल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
Next
संगमनेर (अहमदनगर) : निमोण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार शिजविताना कुकरचा स्फोट होऊन स्वयंपाकी महिला गंभीररित्या भाजल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
शाळेपासून काही फुटाच्या अंतरावर स्वयंपाक घर आहे. तेथे सुनंदा संतोष बडगे (२५) या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत होती. उसळीसाठी लागणारी चवळी कुकरमध्ये टाकून ती दुसऱ्या कामात मग्न होती. चवळीची साल जाड असल्याने शिजण्यास विलंब लागला. १५ मिनिटे गॅसवर कुकर ठेवलेला असताना चवळीची साल शिट्टीत अडकून कुकरचा स्फोट झाला. त्यामुळे स्वयंपाक घराचे पत्रे उडाले. (प्रतिनिधी)