तपास यंत्रणांना देणार आवश्यक ते सहकार्य

By admin | Published: July 11, 2014 11:41 PM2014-07-11T23:41:44+5:302014-07-11T23:41:44+5:30

फरासखाना स्फोटाचा तपास करीत असलेल्या सर्व यंत्रणांसोबत पुणो पोलीस योग्य समन्वय साधत आहेत.

Cooperate with the investigating agencies necessary | तपास यंत्रणांना देणार आवश्यक ते सहकार्य

तपास यंत्रणांना देणार आवश्यक ते सहकार्य

Next
पुणो : फरासखाना स्फोटाचा तपास करीत असलेल्या सर्व यंत्रणांसोबत पुणो पोलीस योग्य समन्वय साधत आहेत. त्यांना तपासासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्यात येत आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवरचा बंदोबस्त तत्काळ वाढविण्यात आलेला असून, सर्व उपायुक्तांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्याची माहिती सह 
पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी दिली. 
फरासखाना पोलीस ठाण्यात झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे एटीएसने जाहीर केले आहे. शुक्रवारी दुपारी गुप्तचर यंत्रणांच्या अधिका:यांसह सह आयुक्तांनी बैठक घेतली. स्फोटासंदर्भात या वेळी चर्चा करण्यात आली. शहर पोलीस आणि गुन्हे शाखा डाटा कलेक्शनवर भर देत असून, खब:यांकडून महत्त्वपूर्ण माहिती काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे कुमार म्हणाले. 
सर्व उपायुक्तांची बैठक घेऊन अॅलर्ट देण्यात आलेला आहे. सर्व महत्त्वाच्या तसेच दहशतवादी हल्ल्याचा धोका असलेल्या ठिकाणांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गर्दीची ठिकाणो दहशतवाद्यांकडून लक्ष्य होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
 
फरासखान्याच्या आवारात यापुढे वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून उचलून आणलेली वाहनेही यापुढे मजूर अड्डा तसेच आवारात लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडे आलेल्या नागरिकांना तसेच पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांना यापुढे आपली ओळख पटवून द्यावी लागेल. वाहनावर स्टिकर अथवा होलोग्राम लावण्यात येतील. त्या ठिकाणी दोन कर्मचा:यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
- संजीव कुमार, सह पोलीस आयुक्त 
 
च्फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. या कॅमे:यांद्वारे होणारे चित्रीकरण हे केवळ निरीक्षणाकरिता आहे. हे चित्रीकरण रेकॉर्ड होत नाही. 
च्परिणामी गुरुवारी घडलेल्या स्फोटाच्या चित्रीकरणाचे संकलन होऊ शकलेले नाही. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे हे केवळ शोभेचेच आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
पोलिसांवर हल्ल्याची दहशतवाद्यांची रणनीती
गर्दीची ठिकाणो लक्ष्य करण्यासोबत पोलिसांवर हल्ला करण्याची रणनीती दहशतवाद्यांनी आखल्याचे एटीएसच्या एका अधिका:याने सांगितले. गेल्या वर्षी नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) मिळविलेल्या दहशतवाद्यांच्या ई-मेल चॅटिंगमध्ये ही बाब उघड झाली होती. पाकिस्तानातील दहशतवादी मिङर शादाब बेग व यासिन भटकळसोबत पकडलेला असदुल्लाह अख्तर ऊर्फ हड्डी यांच्या संभाषणात पोलिसांवर हल्ले तसेच अडचण आल्यास गोळीबार करण्याबाबत बोलणो झाले होते. स्फोटाचे आवश्यक साहित्य  खरेदी करण्याच्या सूचना बेग व हड्डी यांना रियाज भटकळने दिल्या होत्या. एनआयएने 3क् पेक्षा अधिक दहशतवाद्यांकडे याबाबत चौकशी केली आहे. 
 

 

Web Title: Cooperate with the investigating agencies necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.