कोपर्डी - दोषारोप निश्चितीवर आज सुनावणी

By admin | Published: November 9, 2016 05:54 AM2016-11-09T05:54:53+5:302016-11-09T05:54:53+5:30

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील तिघा आरोपींविरोधात बुधवारी दोषारोप निश्चितीबाबत सुनावणी होणार आहे़

Coppardi - hearing today on defamation confirmation | कोपर्डी - दोषारोप निश्चितीवर आज सुनावणी

कोपर्डी - दोषारोप निश्चितीवर आज सुनावणी

Next

अहमदनगर : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील तिघा आरोपींविरोधात बुधवारी दोषारोप निश्चितीबाबत सुनावणी होणार आहे़ तर तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार आहे़
मंगळवारी न्यायालयात आरोपी हजर न केल्याने दोषारोप निश्चितीची सुनावणी होऊ शकली नाही़ कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ उच्च न्यायालयातून निर्णय होईपर्यंत आरोपी विरोधात दोषारोप निश्चिती करू नये तसेच जामीन अर्जावरील सुनावणीही तहकूब करावी, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. त्याला सरकारी पक्षाचे वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी आक्षेप घेत न्यायालयाने आरोपीला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुदत दिली होती़ ही मुदत आता संपली आहे़ सुनावणी तहकूब करणे म्हणजे आरोपीचा वेळकाढूपणा आहे़, असे सांगितले. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत बुधवारी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Coppardi - hearing today on defamation confirmation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.