कोपर्डी खटला अन् चर्चेतील चेहरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:29 AM2017-11-30T04:29:53+5:302017-11-30T04:31:33+5:30

कोपर्डी खटल्यात अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते चर्चेत आले. मुख्यमंत्र्यांना न्यायालयात साक्षीसाठी बोलवा, अशी मागणी या खटल्यात झाली. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचीही साक्ष नोंदविण्याची मागणी झाली.

Copperie suit and face in the discussion | कोपर्डी खटला अन् चर्चेतील चेहरे

कोपर्डी खटला अन् चर्चेतील चेहरे

Next

कोपर्डी खटल्यात अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते चर्चेत आले. मुख्यमंत्र्यांना न्यायालयात साक्षीसाठी बोलवा, अशी मागणी या खटल्यात झाली. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचीही साक्ष नोंदविण्याची मागणी झाली.

मुख्यमंत्री फडणवीस
कोपर्डी खटल्यात आरोपींना फाशीची शिक्षा होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते़ त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांची न्यायालयात साक्ष घेण्याची मागणी आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी केली होती. सरकार या तपासावर दबाव टाकतेय, असा मुद्दा उपस्थित केला गेला.

पालकमंत्री राम शिंदे
पालकमंत्री राम शिंदे व आरोपी संतोष भवाळ हे एका छायाचित्रात सोबत दिसतात, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता.हे छायाचित्र व्हायरलही झाले होते. प्रत्यक्षात मात्र हे छायाचित्र दुसºयाच व्यक्तीचे निघाले. मुख्यमंत्र्यांनी हा उलगडा केला.

अ‍ॅड़ उज्ज्वल निकम
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचीच साक्ष नोंदविण्याची मागणी आरोपी पक्षाने केली. निकम यांनी तपासात पोलिसांना मार्गदर्शन केले, असा या पक्षाचा दावा होता. न्यायालयाने निकम यांनी साक्ष नोंदविण्याची मागणी फेटाळून लावली.

भय्युजी महाराज
कोपर्डी घटनेनंतर राष्ट्रीय संत भय्युजी महाराज हे प्रथमपासून चर्चेत राहिले़ त्यांच्या संस्थेमार्फत कोपर्डीत शालेय मुलींसाठी बससेवा सुरू करण्यात आली़ तर निर्भयाचे कोपर्डी येथे त्यांनी स्मारकही बांधले़ या स्मारकाला मात्र काही संघटनांनी विरोध केला़

बाळासाहेब खोपडे
कोपर्डी खटल्यात आरोपी संतोष भवाळची बाजू अ‍ॅड़ बाळासाहेब खोपडे व त्यांची मुलगी विजयालक्ष्मी यांनी मांडली. त्यांनी या खटल्यात अ‍ॅड़उज्ज्वल निकम यांच्यासह इतर सहा जणांची साक्ष घेण्याची मागणी केली होती. यासाठी ते खंडपीठासह सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती़

अ‍ॅड.प्रकाश आहेर
आरोपी नितीन भैलुमे याच्या वतीने संगमनेर येथील अ‍ॅड़ प्रकाश आहेर यांनी खटला लढविला़ ‘आरोपी नितीन भैलुमे याला कमी शिक्षा द्या’ अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली. त्यामुळे त्यांना निनावी धमकी देण्यात आली. या धमकीबद्दल त्यांनी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये
फिर्याद दिली.

अ‍ॅड़ योहान मकासरे
कोपर्डी घटनेतील आरोपीचे वकिलपत्र घेणार नाही, असा ठराव शहर बार असोसिएशनने केला होता़ विधीसेवा न्याय प्राधिकरणाने आरोपी जितेंद्र शिंदे याच्यासाठी अ‍ॅड़ मकासरे यांची नियुक्ती केली़ मकासरे यांनी शिक्षेवर युक्तिवाद केल्यानंतर त्यांनाही धमकी आली.

शशिराज पाटोळे
स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी कोपर्डी घटनेचा तपास करून घटनेनंतर ८५ दिवसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते़ तपासादरम्यान पाटोळे यांना वेषांतर करून पुरावे एकत्र करावे लागले.

सौरभ त्रिपाठी
कोपर्डी घटना घडली तेव्हा नगरचे पोलीस अधीक्षक म्हणून डॉ़ सौरभ त्रिपाठी कार्यरत होते़ जिल्ह्यात एकापाठोपाठ घडलेल्या गुन्हेगारीच्या
घटनांमुळे त्यांचा कार्यकाल वादग्रस्त ठरला़ कोपर्डीच्या घटनेनंतर तर त्यांच्या बदलीची मागणी झाली़

Web Title: Copperie suit and face in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.