महापालिकेत महिलेकडून कोटींचा भरती घोटाळा

By admin | Published: June 27, 2014 11:17 PM2014-06-27T23:17:26+5:302014-06-27T23:17:26+5:30

महापालिकेच्या कागदपत्रंमध्ये फेरफार करून आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बनावट सह्यांनी भरती प्रक्रिया करून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे.

Cops recruitment scandal in Maha Municipal Corporation | महापालिकेत महिलेकडून कोटींचा भरती घोटाळा

महापालिकेत महिलेकडून कोटींचा भरती घोटाळा

Next
>पुणो : महापालिकेच्या कागदपत्रंमध्ये फेरफार करून आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बनावट सह्यांनी भरती प्रक्रिया करून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याची सूत्रधार महिला आहे. यात प्रशासनातील काही अधिका:यांचा समावेश असल्याची कबुली महिलेने दिल्याने खळबळ उडाली आहे.
फसवणूक झालेल्यांनी एकत्र येऊन चौकशी केल्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला. महापालिकेच्या रुग्णालयात काम करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जानेवारी महिन्यात डॉक्टरांसह, फार्मासिस्ट, शिपाई तसेच सिनिअर आणि ज्युनिअर नर्सेसची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. याच संधीचा गैरफायदा घेत हवेली तालुक्यातील कोलवडी येथील सीमा मुक्ताजी नितनवरे या महिलेने गरजूंना हेरले आणि तुम्हाला महापालिकेत नोकरी लावते, असे आमिष दाखविले. मात्र, या कामासाठी महापालिकेतील वरिष्ठ अधिका:यांना पैसे द्यावे लागतील, असे तिने या गरजूंना सांगितले. 
डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट तसेच शिपाई पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून दोन ते पाच लाखांची रक्कम नितनवरेने घेतली. हा व्यवहार व्यवस्थित व्हावा यासाठी तिने गट तयार करून प्रत्येकाकडून पैसे मिळविण्याची जबाबदारी त्या गटप्रमुखांकडे सोपविली होती. या घोटाळ्यात सुमारे 58 जणांकडून प्रत्येकी वीस लाख रुपये घेतल्याची शक्यता आहे.
हा प्रकार करताना तिने आयुक्त कार्यालयातील कागदपत्रंतही फेरफार करून बनावट आवक तसेच जावक क्रमांकही टाकले. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या बनावट सहीचा वापर करून तिने नियुक्तीची पत्रेही देऊन ‘पोलीस व्हेरिफिकेशन’ही करायला लावले. हा घोटाळा उघड होऊ नये यासाठी तिने चार ते पाच जणांना काम न करता तीन ते चार महिन्यांचे वेतनही दिले. (प्रतिनिधी)
 
या बनावट भरती प्रक्रियेमुळे गरजू तरुणांची फसवणूक झाली आहे. त्यात महापालिकेच्या कागदपत्रंचा आणि अतिरिक्त आयुक्तांच्या सहीचा गैरवापर झाल्याने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी आढळणा:या अधिकारी तसेच कर्मचा:यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावे. गरजूंना न्याय देण्यासाठी त्यांनी दिलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. 
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपाइं गटनेते महापालिका 
 
4नियुक्तीची पत्रे दिल्यानंतर या उमेदवारांना प्रत्यक्षात कामावर रुजू करुन घेण्यासाठी नितनवरे टाळाटाळ करत होती. त्यामुळे या नियुक्तिपत्रची खातरजमा करण्यासाठी फसवणूक झालेले सर्व गरजू संघटित झाले.
4त्यांनी महापालिकेतील रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची भेट घेऊन त्यांना ही व्यथा सांगितली. डॉ. धेंडे यांनी या नियुक्तिपत्रंची खातरजमा केल्यानंतर ही पत्रेच बनावट असल्याचे निष्पन्न झाले; त्यानुसार या उमेदवारांनी नितनवरे हिच्या विरोधात काल रात्री रामवाडी पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. 
4याप्रकरणी महापालिका आयुक्त विकास देशमुख यांची येत्या सोमवारी ( दि. 30 ) भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.

Web Title: Cops recruitment scandal in Maha Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.