मंत्रिमंडळात वर्णीसाठी रस्सीखेच

By Admin | Published: October 20, 2014 12:39 AM2014-10-20T00:39:31+5:302014-10-20T00:39:31+5:30

राज्यात भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मानले जात आहे. असे झाले तर सत्ताकेंद्र म्हणून महत्त्व आलेल्या नागपूरला

The cordial rope for the cabinet | मंत्रिमंडळात वर्णीसाठी रस्सीखेच

मंत्रिमंडळात वर्णीसाठी रस्सीखेच

googlenewsNext

तेली, कुणबी, दलित समीकरण : खोपडे, बावनकुळे, देशमुख, माने स्पर्धेत
कमलेश वानखेडे - नागपूर
राज्यात भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मानले जात आहे. असे झाले तर सत्ताकेंद्र म्हणून महत्त्व आलेल्या नागपूरला मंत्रिमंडळातही मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदे देताना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सामाजिक निकषांचा आधार घेतला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे आमदारांमध्ये मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.
तेली समाज बऱ्यापैकी भाजपच्या बाजूने झुकला आहे. पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे व कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही आमदार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेत्यांनी ‘तुम्ही निवडून आणा, आम्ही लालबत्ती देतो’, असे आवाहन मतदारांना केले होते. खोपडेंनी दुसऱ्यांदा विजय नोंदविला तर बावनकुळे यांनी हॅट्ट्रिक मारली आहे. खोपडे यांनी ४८ हजारावर मतांनी तर बावनकुळे यांनी ४० हजारावर मतांनी विजय नोंदवीत जनमत आपल्यासोबत असल्याचे सिद्ध केले आहे. आता या दोन नेत्यांपैकी एकाची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण संधी कुणाला द्यायची, यावरून पक्षापुढे पेच निर्माण होऊ शकतो.
कुणबी समाजातून असलेले सुधाकर देशमुख, समीर मेघे, आशिष देशमुख, सुधाकर कोहळे हे चार आमदार विजयी झाले आहेत. यात सुधाकरराव देशमुख हे सिनिअर आहेत. शिवाय दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रचार प्रमुख तर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता जास्त आहे. असे असले तरी समीर हे माजी खा. दत्ता मेघे यांचे पुत्र तर आशिष हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. दोन्ही नेते दिग्गज असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी मेघे-देशमुखांकडून पक्षावर दबाव बनविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. मिलिंद माने हे दलित समाजाचे नेते आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून ३५ हजारावर मते घेतली होती. यावेळी भाजपने त्यांना संधी देताच त्यांनी बाजी मारली.
नागपूर जिल्ह्यात भाजपला डॉ. माने यांच्या रूपात एक सुशिक्षित व आंबेडकरी चळवळीत पकड असलेला दलित चेहरा मिळाला आहे. भविष्यातील भाजप समोरची आव्हाने विचारात घेता डॉ. माने यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The cordial rope for the cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.