सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्य शासनाच्या वतीने कोरोनामुक्त गाव स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 06:30 PM2021-06-02T18:30:48+5:302021-06-02T18:34:47+5:30

Hasan Mushrif : ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी राज्य शासनाच्या वतीने ह्यकोरोनामुक्ती गाव स्पर्धाह्ण चे आयोजन केल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केली. महसूल विगागातील तीन ग्रामपंचायतींचा गौरवही केला जाणार आहे.

Corona free village competition on behalf of the state government | सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्य शासनाच्या वतीने कोरोनामुक्त गाव स्पर्धा

सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्य शासनाच्या वतीने कोरोनामुक्त गाव स्पर्धा

Next
ठळक मुद्दे हसन मुश्रीफ यांची माहीती महसूल विभागातील तीन ग्रामपंचायतींचा होणार गौरव

कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी राज्य शासनाच्या वतीने कोरोनामुक्ती गाव स्पर्धा चे आयोजन केल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केली. महसूल विगागातील तीन ग्रामपंचायतींचा गौरवही केला जाणार आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून अनेक गावे हॉटस्पॉट होत आहेत. नागरिकांनी स्वताहून काळजी घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

कोरोनामुक्त गावांना १५ ते ५० लाखाचे बक्षीस

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार. सहा महसुली विभागात प्रत्येकी तीन या प्रमाणे राज्यात १८ बक्षीसे दिली जाणार असून ५ कोटी ४० लाख रुपये बक्षीसाची रक्कम होत आहे.

कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे

याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष पंचवीस -पंधरा (२५१५) व तीस-चोहोपन (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार.

 

Web Title: Corona free village competition on behalf of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.