जानेवारीअखेर कोरोना उच्चांकी; जिल्हास्तरावर होम आयसोलेशन किट, राजेश टोपेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 07:11 AM2022-01-11T07:11:26+5:302022-01-11T07:11:36+5:30

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येईल.

Corona highs in late January; District level home isolation kit | जानेवारीअखेर कोरोना उच्चांकी; जिल्हास्तरावर होम आयसोलेशन किट, राजेश टोपेंची माहिती

जानेवारीअखेर कोरोना उच्चांकी; जिल्हास्तरावर होम आयसोलेशन किट, राजेश टोपेंची माहिती

Next

जालना : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून जानेवारी अखेरीस रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल, त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.  

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येईल. तसेच कोरोना तपासणी चाचण्यांची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.  

जानेवारीअखेर कोरोना उच्चांकी

जास्त झाले आहे त्या ठिकाणी मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे लसीकरणाची गती आणखी वाढवण्यावर भर देणार आहे. राज्यातील जवळपास ९० टक्के लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली असून ६९ टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.  देशभरात क्वारंटाइनचा कालावधी हा सातच दिवस राहणार असून त्यात कोणताही बदल होणार नाही असे केंद्राने सांगितल्याचे टोपे म्हणाले. 

Web Title: Corona highs in late January; District level home isolation kit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.