corona in karnataka-कलबुर्गीत आणखी 5 रुग्ण, कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या 427

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:43 PM2020-04-22T17:43:38+5:302020-04-22T17:45:02+5:30

कर्नाटक राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी सायंकाळपासून आज बुधवारी दि 22 एप्रिल दुपारी रोजी 9 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या आता 427 झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 129 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona in karnataka- 5 more patients in Kalburg, number of corona cases in Karnataka 427 | corona in karnataka-कलबुर्गीत आणखी 5 रुग्ण, कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या 427

corona in karnataka-कलबुर्गीत आणखी 5 रुग्ण, कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या 427

Next
ठळक मुद्देकलबुर्गीत आणखी 5 रुग्णकर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या 427

बेळगाव : कर्नाटक राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी सायंकाळपासून आज बुधवारी दि 22 एप्रिल दुपारी रोजी 9 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या आता 427 झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 129 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कर्नाटक राज्य सरकारने आज बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता प्रसिद्धीस दिलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 425 झाली आहे. यामध्ये काल मंगळवार दि 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सापडलेल्या सात कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.

या सात जणांपैकी 5 जण कलबुर्गी येथील असून दोघेजण बेंगलोर शहरातील आहेत. राज्यातील एकूण 425 करुणा बाधित रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 129 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बेंगलोर येथील एका पुरुष (वय 54) आणि महिला (वय 28) कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी महिलेला पी - 208 या रुग्णाकडून कोरोनाची बाधा झाली आहे. कलबुर्गी येथे आढळून आलेल्या पाच रुग्णांमध्ये तीन महिलांचा (वय 46,35 व 26) समावेश आहे.

यापैकी 46 वर्षीय महिला पी - 222, 35 वर्षीय महिला पी - 329 आणि 26 वर्षीय महिला पी - 329 या क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाली आहे. त्याचप्रमाणे कलबुर्गी येथील 4 महिन्याच्या बालकाला त्याच्या आईपासून ( उपरोक्त 26 वर्षीय महिला) कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: corona in karnataka- 5 more patients in Kalburg, number of corona cases in Karnataka 427

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.