राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढताहेत अलर्ट राहावे लागेल: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:21 PM2020-06-23T16:21:58+5:302020-06-23T16:23:53+5:30
लॉकडाऊन वाढविणे योग्य ठरणार येणार नाही...
पिंपरी : महाराष्ट्रात वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यासाठी अलर्ट रहावे लागेल. मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. पावसाळ्यात आणखी रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून तयारी केली जात आहे. अतिरिक्त नमुने (स्वॅब) तपासण्याची सुविधा पालिका उभी करत आहे. माहिती घेऊन शासनाकडे तशी विनंती करेल, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि वायसीएमएचचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडून कोरोना सद्यस्थिती आणि उपाययोजनांची माहिती घेतली.
ऑक्सिजन बेड वाढविण्याची गरज
फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाची लढाई कशी चालली आहे. विशेषत रुग्णालयाचे व्यवस्थापन कशाप्रकारे चालले आहे. कोणत्या प्रकारचे रुग्ण येतात. याची माहिती घेतली. वेगवेगळे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालले आहेत. महापालिकेने तयार केलेला डॅशबोर्ड चांगला आहे. त्यामुळे काही प्रमाणात यशही आले आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात रुग्ण वाढू लागले आहेत. पावसाळ्यात रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून तयारी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन बेड उपलब्ध असतील. रुग्ण नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल.’’
व्यवस्था निर्माण करावी लागेल
फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती बघता ज्या वेगाने रुग्ण वाढ होत आहे. त्यासाठी फार अलर्ट रहावे लागेल. अधिक मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. त्यादृष्टीने कामकाज करावे लागेल. अतिरिक्त नमुने तपासण्याची सुविधा पालिका उभी करत आहे. त्याहीपेक्षा अधिकची आवश्यकता असेल. तर मी स्वत: माहिती घेऊन शासनाकडे तशी विनंती करेल.’’
लॉकडाउन वाढविणे योग्य ठरणार नाही
फडणवीस म्हणाले, ‘‘लॉकडाउन करता येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. लोकांची मानसिकता देखील नाही. लॉकडाउनच्या काळामध्ये व्यवस्थापनाची तयारी केली आहे. लोकांची जनजागृती वाढविली आहे. तो अधिक वाढवून आपल्याला लॉकडाउन नसाताना देखील कोविड संदभार्तील जे काही नियम आहेत. ते कसे पाळता येतील. याच्यावर जास्त भर द्यावा लागेल. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनमध्ये परत जायच्याऐवजी आपल्याला समोर कसे जाता येईल. तरी, देखील कोविड कसा नियंत्रणात आणता येईल.’’