कोरोना लसीचा डोस घेतला अन्...; आजीबाईंचा दावा ऐकून वैद्यकीय दिग्गजांचेही डोळे चमकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:49 AM2021-07-05T09:49:54+5:302021-07-05T09:50:13+5:30

आजीने 26 जूनला रिसोड येथील समता फाउंडेशनकडून सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड या लसचा पहिला डोस घेतला.

Corona took a dose of vaccine and ...; The eyes of the medical veterans also shone after hearing the claim of the grandmother | कोरोना लसीचा डोस घेतला अन्...; आजीबाईंचा दावा ऐकून वैद्यकीय दिग्गजांचेही डोळे चमकले

कोरोना लसीचा डोस घेतला अन्...; आजीबाईंचा दावा ऐकून वैद्यकीय दिग्गजांचेही डोळे चमकले

googlenewsNext

कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहे  त्यामुळे  सरकारकडून दिली जाणाऱ्या  लसीकरण केंद्राकडे अनेकांनी पाठ फिरवली.  मात्र काही ठिकाणी लसीकरण झालेल्या नागरिकांना  सकारात्मक आणि चमत्कारिक परिणाम ही  दिसायला  लागले आहेत. वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी  भागातील एका आजींची गेल्या 9 वर्षापासून गेलेली दृष्टी चक्क लस घेतल्यानंतर आली असल्याची माहिती समोर आली आहे. 

वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या  मथुराबाई  बिडवाई  या 70 वर्षाच्या  वर्षाच्या आजीचं आयुष्य  गेल्या  9 वर्षांपासून अंधारामय होते.  कारण दहा  वर्षापूर्वी  मोतीबिंदूमुळे बुबुळ पांढरी झाली आणि  दोन्ही डोळ्यांनी दिसणे बंद झाले . मथुराबाई या मुळच्या  जालना  जिल्ह्यातील  परतूरच्या  मात्र  त्यांना 9  वर्षा  अगोदर  अंधत्व आलं आणि त्यांच्या  जीवन  कायमच  अंधारमय झालं.  

घरी मुलबाळ पती नसलेल्या त्यांच्या नातेवाईकाने आधार देण्यासाठी  रिसोड येथे आणले.  या दरम्यान  या आजीने 26 जूनला रिसोड येथील समता फाउंडेशनकडून सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड या लसचा पहिला डोस घेतला आणि या आजीला आता दोन्ही डोळ्यांनी दिसायला लागलं. या आजीला गेली 9 वर्षा पासून दिसत नव्हते आता त्यांना लस घेतल्यामुळे अचानक स्पष्ट दिसायला लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका डोळ्यांनं 30 ते 40 टक्के दिसायला लागल्याचा त्यांचा दावा आहे.आधी मथुराबाई लस घेण्यास तयारच नव्हत्या. मात्र कुटुंबीयांनी आग्रह केला आणि त्यांनी लस घेतली. त्यानंतर हा चमत्कार घडल्याचं घरची मंडळी सांगत आहेत. 

डॉक्टरांनी मात्र लस घेतल्यावर असं होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलंय. या घटनेचा सखोल अभ्यास करावा लागेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मथुराबाईंच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आला असला तरी हा नेमका लसीचा परिणाम आहे की अन्य काही कारणामुळे त्यांची दृष्टी आली आहे. हे अधिक संशोधनानंतरच समजेल असंही सांगण्यात आलं आहे. 

Web Title: Corona took a dose of vaccine and ...; The eyes of the medical veterans also shone after hearing the claim of the grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.