राज्यात दिवसभरात २४,२८२ कर्मचाऱ्यांना कोरोना लस; आतापर्यंत एक लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 02:40 AM2021-01-24T02:40:31+5:302021-01-24T07:08:07+5:30
आतापर्यंत सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना लस : गाेंदिया जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद
मुंबई : राज्यात शनिवारी २९० केंद्रांवर २४ हजार २८२ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाचे प्रमाण ८३ टक्के आहे. दिवसभरात सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ गडचिरोली,
वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ९९ हजार २४२ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात शनिवारी २९७ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण १५७२ जणांना ही लस देण्यात आली.
पाच दिवस होणार लसीकरण सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र घेण्यात येईल. ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.