Corona Vaccination: राज्यात बूस्टर डाेसचा प्रवास कासवगतीने; आतापर्यंत ४ लाख ६४ हजार ५८१ लाभार्थ्यांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:52 AM2022-01-21T07:52:26+5:302022-01-21T07:52:45+5:30
राज्यात दक्षता मात्रा मोहिमेला मिळालेला एकूण प्रतिसाद पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फ्रंटलाइन कर्मचारी आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपेक्षा ६० हून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांनी या लसीकरणात अग्रक्रम मिळविला आहे.
मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण मिळविण्यासाठी नव्या वर्षात देशासह राज्यात दक्षता मात्रा कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, राज्यात दक्षता मात्रा मोहिमेला थंड प्रतिसाद दिसत असून आतापर्यंत अवघ्या ४ लाख ६४ हजार ५८१ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.
राज्यात दक्षता मात्रा मोहिमेला मिळालेला एकूण प्रतिसाद पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फ्रंटलाइन कर्मचारी आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपेक्षा ६० हून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांनी या लसीकरणात अग्रक्रम मिळविला आहे.
याविषयी टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, गेल्या २-३ आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांचा दक्षता मात्रा घेण्याचा कालावधी पुढे गेला आहे.
मुंबईत आतापर्यंत ३२,४६६ आरोग्य कर्मचारी, ४१,४०३ फ्रंटलाइन कर्मचारी आणि २७,१७४ साठहून अधिक वयोगटातील लाभार्थ्यांनी दक्षता मात्रा घेतली आहे. राज्यातील स्थिती पाहता मुंबई, पुणे आणि ठाणे आघाडीवर असून अन्य २३ जिल्हे राज्याच्या सरासरी प्रमाणापेक्षा कमी स्थानावर आहेत.