Corona Vaccination: राज्यात १४ कोटी ३७ लाख जणांना दिली कोरोनालस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:58 AM2022-01-19T06:58:01+5:302022-01-19T06:58:48+5:30
राज्यात ८ कोटी ४९ लाख ६७ हजार ७०४ जणांना लसीचा पहिला, तर ५ कोटी ८४ लाख २३ हजार ८९४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
मुंबई : आतापर्यंत राज्यात एकूण १४ कोटी ३७ लाख ७० हजार १९८ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात ८ कोटी ४९ लाख ६७ हजार ७०४ जणांना लसीचा पहिला, तर ५ कोटी ८४ लाख २३ हजार ८९४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
राज्यभरात १८ ते ४४ वयोगटातील ४,७५,८७,४९८ जणांनी पहिला, तर ३,१४,४९,८९९ जणांनी दुसरा डोस घेतला. राज्यात १२,९४,६८४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ११,७६,९५७ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. २१,४८,६५७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी पहिला, तर १९,७२,९६५ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत १ लाख ४७ हजार ८२९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी, तर १ लाख १५ हजार ७२२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी दक्षता मात्रा घेतली आहे. ६० हून अधिक वयोगटातील १,३१,६१,६६ जणांनी पहिला, तर ९८,२२,५७५ जणांनी दुसरा डोस घेतला. तर १,१५,०४९ जणांनी दक्षता मात्रा घेतली आहे.
२६ लाखांहून अधिक लहानग्यांना लस
राज्यात १५ ते १८ वयोगटातील २५ लाख १९ हजार ८५९ जणांना लस देण्यात आली आहे. त्यात पुण्यात २४४५९३, ठाण्यात २२७७२५, अहमदनगर १४२७६७, मुंबई १४७२७७, कोल्हापूर १२०५२४, नाशिक १३७४०५ इत्यादींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.