Corona Vaccination: राज्यात 13 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 04:58 AM2021-03-04T04:58:53+5:302021-03-04T04:59:06+5:30
Corona Vaccination: आरोग्य विभाग; दिवसभरात ५१ हजार जणांचे लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात ७६९व्या लसीकरण सत्रात एकूण ५१ हजार २४० जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, ४१,२२५ जणांना लसीचा पहिला डाेस, तर १० हजार १५ जणांना दुसरा डाेस देण्यात आला. ७ हजार ४१० आरोग्य कर्मचारी तसेच ५,९७३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात आतापर्यंत १३ लाख ७१ हजार ८८६ जणांना कोरोना लस देण्यात आली.
१० हजार १५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या ३ हजार ६५६ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयोगटातील २४,१८६ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ५०,२६३ लाभार्थ्यांना कोविशिल्ड, तर ९७७ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसी देण्यात आली.
मुंबईत २ लाख ४५ हजारांहून लाभार्थ्यांना लस
nराज्यात सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत २ लाख ४५ हजार ६५७ लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर पुणे १ लाख ३८ हजार ८६९, ठाणे १ लाख १६ हजार ३४१, नागपूर ६२ हजार १२६ आणि नाशिक ६२ हजार ४२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
nराज्यात लसीकरणाला सर्वांत कमी प्रतिसाद हिंगोलीत ९ हजार ३९०, वाशिम १० हजार ६८६, परभणी १२ हजार ७२८, उस्मानाबाद १४ हजार ६७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.