Corona Vaccine: राज्यातील दाेन लाख आराेग्य कर्मचाऱ्यांची ॲपमध्ये नाेंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 01:46 AM2020-12-14T01:46:54+5:302020-12-14T01:47:09+5:30

तीन कोटी लसींचे डोस साठविण्याची तयारी पूर्ण

Corona Vaccine: Registration of two lakh health workers in the state in the app | Corona Vaccine: राज्यातील दाेन लाख आराेग्य कर्मचाऱ्यांची ॲपमध्ये नाेंदणी

Corona Vaccine: राज्यातील दाेन लाख आराेग्य कर्मचाऱ्यांची ॲपमध्ये नाेंदणी

Next

मुंबई : राज्यात सध्या तीन कोटी लसीचे डोस साठविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्राला कोल्ड चेन पुरवठा आणि साठवण सुविधांविषयी स्थिती अहवाल दिला असून, त्यात ही माहिती दिली. याशिवाय राज्यात १.९१ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नाेंदणी सरकारी अ‍ॅपवर पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी करण्यात आली.राज्यात एका केंद्रावर साधारण १०० जणांना एका वेळी लस देता येईल, अशी तयारी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली, तर मुंबईतील १.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या कालावधीत आठ केंद्रांवर कोविड लस दिली जाईल.

शासनाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला लसीकरणासाठी दिनांक, वेळ, लसीकऱण केंद्राबाबतची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.केंद्राकडून कोल्ड साखळी सुविधांच्या मूल्यांकनासंदर्भात राज्य सुविधांच्या बाबतीत अग्रेसर आहे. इतर राज्यांपेक्षा चांगल्या सुविधा राज्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात लसींच्या वाहतुकीसाठी अधिक रेफ्रिजरेटर आणि इन्सुलेटर व्हॅन मिळणार आहेत.* केंद्राच्या याेजनेनुसार असा असेल क्रमकेंद्राच्या योजनेनुसार वैद्यकीय कर्मचारी प्रथम लसीकरण करतील. त्यानंतर, आरोग्य कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस, वाहतूक कर्मचारी अशा क्रमाने ही लस दिली जाईल, असे राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितले.

Web Title: Corona Vaccine: Registration of two lakh health workers in the state in the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.