राज्यात 60 लाख मुलांना मिळणार कोरोनाची लस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 06:40 AM2022-01-01T06:40:56+5:302022-01-01T06:47:37+5:30
Corona vaccine : राज्यात १५ ते १८ वयोगटातील ६० लाख ६३ हजार लाभार्थी असून त्यांना केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : केंद्रीय मंत्रालयाकडून पत्र प्राप्त होताच राज्याच्या आरोग्य विभागाने १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन केले आहे. याबाबत अतिरिक्त आरोग्य संचालकांनी उपसंचालक ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वच अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
राज्यात १५ ते १८ वयोगटातील ६० लाख ६३ हजार लाभार्थी असून त्यांना केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ केअर वर्कर यांना बुस्टर डोस तर ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्यानुसार प्रिकॉशन डोस देण्यात येईल.
असे होईल लसीकरण एकूण लोकसंख्या
१३,४४,३७,०००
१५ ते १८ वयोगट
६०,६३,०००
६० वर्षांवरील
२९,०९,६००
याकडे द्या लक्ष
दुसऱ्या डोसनंतर ९ महिने अथवा ३९ आठवडे पूर्ण झाल्यावरच घेता येणार प्रिकॉशन डोस.
हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ६० वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी ही अट आहे.
कधी मिळणार?
१५ ते १८ वयोगट -
३ जानेवारी २०२२ पासून
हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ६० वर्षांवरील - १० जानेवारी २०२२ पासून
राज्यातील बोलकी आकडेवारी
जिल्हा लोकसंख्या १५ ते १८ वयोगट ६० वर्षांवरील
अहमदनगर ४९,०४,०६० २,३८,९४३ १,१४,६६७
अकोला १९,५०,०८० ९५,०१५ ४५,५९७
अमरावती ३०,७७,७०१ १,४९,९५६ ७१,९६३
औरंगाबाद ४३,८८,५११ २,१३,८२३ १,०२,६१३
बीड २९,३३,२६३ १,४२,९१९ ६८,५८६
भंडारा १२,२२,५७६ ५९,५६८ २८,५८६
बुलडाणा २८,६४,५६७ १,३९,५७२ ६६,९८०
चंद्रपूर २२,४६,४१५ १,०९,४५३ ५२,५२६
धुळे २३,२८,३८२ १,१३,४४७ ५४,४४२
गडचिरोली ११,३९,५३९ ५५,५२२ २६,६४५
गोंदिया १४,०२,२२७ ६८,३२१ ३२,७८७
हिंगोली १३,३५,४५२ ६५,०६८ ३१,२२६
जळगाव ४६,३६,३२५ २,२५,८९८ १,०८,४०७
जालना २२,४५,८९३ १,०९,४२८ ५२,५१४
कोल्हापूर ४१,०२,४९६ १,९९,८८८ ९५,९२५
लातूर २७,५६,६६५ १,३४,३१४ ६४,४५७
मुंबई १,२५,७०,१५० ६,१२,४६१ २,९३,९१७
नागपूर ५०,९५,४०५ २,४८,२६६ १,१९,१४१
नांदेड ३७,३४,८०३ १,८१,९७२ ८७,३२८
नंदुरबार १९,३२,८०४ ९४,१७३ ४५,१९३
नाशिक ७०,४३,९४४ ३,४३,२०५ १,६४,७०२
उस्मानाबाद १७,८२,११४ ८६,८३१ ४१,६७०
पालघर ३४,६६,७४५ १,६८,९१२ ८१,०६०
परभणी २०,८९,४३८ १,०१,८०५ ४८,८५५
पुणे १,१३,५३,६६२ ५,५३,१९० २,६५,४७३
रायगड २९,८३,८४८ १,४५,३८३ ६९,७६९
रत्नागिरी १४,७२,४६४ ७१,७४४ ३४,४२९
सांगली २९,६८,११८ १,४४,६१७ ६९,४०१
सातारा ३१,०२,२३४ १,५१,१५२ ७२,५३७
सिंधुदुर्ग ७,९९,९२५ ३८,९७५ १८,७०४
सोलापूर ४६,४६,८८० २,२६,४१२ १,०८,६५४
ठाणे १,०२,०३,५८८ ४,९७,१५४ २,३८,५८१
वर्धा १३,१३,३३५ ६३,९९० ३०,७०९
वाशिम १३,३६,९३८ ६५,१४० ३१,२६०
यवतमाळ ३०,०६,४५० १,४६,४८५ ७०,२९७