Corona Virus : कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं; मुंबईत आढळले 2000 हून अधिक रुग्ण, अशी आहे राज्याची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 10:44 PM2022-06-19T22:44:38+5:302022-06-19T22:45:41+5:30
याचबरोबर मुंबई शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी एकूण 24,825 बेड उपलब्ध आहेत. त्यांपैकी 652 बड सध्या उपचारासाठी वापरल्या जात आहेत.
मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहेत. शहरात गेल्या 24 तासात एकूण 2,087 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या एकूण संक्रमित रुग्णांपैकी 95 टक्के म्हणजे 1992 एवढ्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत.
याचबरोबर मुंबई शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी एकूण 24,825 बेड उपलब्ध आहेत. त्यांपैकी 652 बड सध्या उपचारासाठी वापरल्या जात आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, BMC ने आज एकूण 15,026 लोकांची कोरोना चाचणी केली. सध्या मुंबईत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97 टक्के एवढे आहे.
महाराष्ट्रात 4004 नवे रुग्ण -
महाराष्ट्रासंदर्भात बोलायचे झाल्यास, येथे गेल्या 24 तासांत तब्बल 4004 एवढ्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी 2,087 रुग्ण मुंबईतील आहेत. याच बरोबर, माध्यमांतील वृत्तांनुसार, राज्यात गेल्या 7 दिवसांत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शनिवारी 3883 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
राजधानी दिल्लीत 1530 नवे रुग्ण -
राजधानी दिल्ली संदर्भात बोलायचे झाल्यास, येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. येथे सलग पाचव्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. गेल्या 24 तासांत येथे 1530 रुग्णांची नोंद झाली आहे, तर तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 8.41% एवढा आहे.