Corona Virus: रायगडच्या पर्यटनाला कोरोनाचा फटका; परदेशी पर्यटकांना नो एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:29 PM2020-03-08T23:29:06+5:302020-03-08T23:30:01+5:30

हॉटेल, रिसॉर्टमधील बुकिंग रद्द

Corona Virus: Corona hit for Raigad tourism; No entry for foreign tourists | Corona Virus: रायगडच्या पर्यटनाला कोरोनाचा फटका; परदेशी पर्यटकांना नो एन्ट्री

Corona Virus: रायगडच्या पर्यटनाला कोरोनाचा फटका; परदेशी पर्यटकांना नो एन्ट्री

Next

अलिबाग : सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. शनिवारपासून लागोपाठ होळीची सुट्टी असल्याने अनेकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे बेत आखले. मात्र, कोरोनाच्या धसक्याने जिल्ह्यात येणाºया पर्यटकांना हे बेत रद्द करावे लागले आहेत. रिसॉर्ट, हॉटेल, लॉजिंगमध्ये केलेले बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फटका जिल्ह्यातील हजारो हॉटेल, रिसॉर्ट आणि समुद्रकिनाºयावरील व्यावसायिकांना बसला आहे.

परदेशी नागरिकांना जिल्ह्यात नो एन्ट्री असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. दरवर्षी होळीच्या निमित्त गजबजणारे समुद्रकिनारे यंदा सामसुम दिसत आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, वरसोली, काशिद, दिवेआगार, हरिहरेश्वर, श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे धूलिवंदन आणि होळी सणाच्या निमित्ताने गर्दीने फुलून जातात. हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये तर जागाही मिळत नाही. मुंबई, पुणे, ठाणे या भागातून अनेक कुटुंबे चार दिवस येणाºया सुट्टीची संधी साधून आपल्या बच्चेकंपनीसह पर्यटनासाठी जाणार होते. मात्र, या वेळेला कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी प्लॅन रद्द केले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि प्रशासनाने गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गजन्य रोग असल्याने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून नागरिकही सतर्कता बाळगत असल्याने यंदा होळीनिमित्त आणि सुट्टीमुळे जिल्ह्यात येणाºया पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे.

रायगडमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे परदेशी पर्यटक अलिबाग, काशीद येथील उच्चभ्रू रिसॉर्टमध्ये राहतात. मात्र, जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून परदेशी पर्यटकांना जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला आहे. बोटीने येणाºया पर्यटकांच्या तपासणीसाठी मांडवा जेट्टी येथेदेखील विशेष पथक आरोग्य विभागाकडून नेमले जाणार आहे.

Web Title: Corona Virus: Corona hit for Raigad tourism; No entry for foreign tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.