corona virus ; औषध निर्मितीत भारत होणार स्वयंपूर्ण, ५३ रसायनांची निर्मिती करण्यात एनसीएलचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 09:44 PM2020-03-30T21:44:37+5:302020-03-30T21:51:05+5:30
भारत औषध निर्मितीसाठी लागणा-या कच्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून आहे.परिणामी पुढील काळात औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. भारत औषध निर्मितीसाठी लागणा-या कच्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून आहे.परिणामी पुढील काळात औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जीवनावश्यक औषधांच्या निर्मितीसाठी लागणा-या कच्च्या मालाची आयात खंडित झाली आहे. भारत औषध निर्मितीसाठी लागणा-या कच्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून आहे. परिणामी पुढील काळात औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या कच्च्या मालाचे परावलंबित्व संपवण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रायोगशाळेने (एनसीएल) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी स्वदेशी पद्धतीने ५३ प्रकारच्या रसायनांची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
देशात औषधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असली तरी त्यासाठी लागणारा कच्चा माल भारताला आयात करावा लागातो होता. स्वस्त असल्याने हा कच्चा माल इतर देशातून केला जात होता. परंतु,सध्या देशांतर्गत आयात-निर्यात बंद आहे. त्यामुळे कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २१ मार्चला झालेल्या कॅबिनेट बैठकीत औषधांबाबत चर्चा करण्यात आली. औषध निर्मितीसाठी आवश्यक अभिक्रिया कारक, उत्प्रेरक, रसायने, प्रक्रिया,तंत्र यांसह उद्योगांशी आणि उत्पादकांशी समन्वय करण्याबाबत या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच देशातील नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आणि मोठा खप असलेल्या औषधांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच रसायनांची निश्चिती राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली.
'एनसीएल'ने या तीन ते चार रासायनांवर काम सुरु केले असून सेंद्रीय रसायनशास्त्रज्ञ (ऑरगॅनिक) आणि रसायन अभियंते यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण केले जात आहे. पूढील काही आठवड्यात ही रसायने निर्मित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया विकसित केली जाणार आहे. एनसीएलमध्ये पुढील काही आठवड्यांमध्येच रसायन निर्मितीची प्रक्रिया विकसित केली जाईल आणि पुढील कार्यवाही साठी सरकार आणि उत्पादकांना त्याचे अहवाल सादर केले जातील.त्यामुळे पुढील काही महिन्यांतच विविध औषधांचे उत्पादन आपल्या देशातील औद्योगिक कंपन्या करशकतील.
: डॉ.अश्विनी कुमार नांगीया, संचालक, एनसीएल.
- राष्ट्राच्या संरक्षणासाठी औषधांच्या बाबतीतील स्वयंमपूर्णता सर्वात महत्वपूर्ण आहे.
- एनसीएल आग्रही आहे. त्यासाठी आवश्यक कच्च्या मालाची निर्मिती करणे आणि त्याचे स्वामित्वहक्क मिळवण्यासाठी देशाने महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे.
- औषध निर्मितीसाठी अमेरिकेनंतर भारतात सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक उपलब्ध आहे.
- देशात संसर्गजन्य आजार, जीवणूजन्य आजार, कवकजन्य आजार, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार, वेदनाशामक आदीसाठी लागणा-या औषधांच्या कच्च्या मालाची निर्मिती होणार आहे.