CoronaVirus News : राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०६ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 05:52 AM2020-12-21T05:52:56+5:302020-12-21T05:53:14+5:30
Corona Virus News: राज्यात रविवारी काेराेनाच्या ३ हजार ८११ रुग्णांचे निदान झाले असून, ९८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ झाली असून, मृतांची संख्या ४८ हजार ७४६ एवढी आहे.
मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात काेराेनाचे २ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत १७ लाख ८३ हजार ९०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०६ टक्के झाले असून, सध्याचा मृत्युदर २.५७ टक्के आहे. सध्या ६२ हजार ७४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
राज्यात रविवारी काेराेनाच्या ३ हजार ८११ रुग्णांचे निदान झाले असून, ९८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ झाली असून, मृतांची संख्या ४८ हजार ७४६ एवढी आहे.
सध्या ५ लाख २ हजार ३६२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३ हजार ७३० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
राज्याच्या एकूण काेराेनाच्या रुग्णसंख्येत पुरुष रुग्ण ६१ तर महिला रुग्ण ३९ टक्के आहेत. लिंगनिहाय मृत्यूचे प्रमाण पुरुष ६५, तर महिला ३५ टक्के असे आहे. अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७ टक्के असून, अतिजोखमीच्या आजारांचे बळी ७० टक्के आहेत.