Corona virus : राज्यभरातच होईना कोरोनामुक्त रुग्णांचे ‘अपडेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 11:40 AM2020-09-23T11:40:14+5:302020-09-23T11:40:58+5:30

पुणे सर्वात मागे तर मुंबईची आघाडी

Corona virus: No 'Update' of corona-free patients across the state | Corona virus : राज्यभरातच होईना कोरोनामुक्त रुग्णांचे ‘अपडेट’

Corona virus : राज्यभरातच होईना कोरोनामुक्त रुग्णांचे ‘अपडेट’

googlenewsNext
ठळक मुद्देप्रामुख्याने पुण्यासह ठाणे व नागपुर जिल्ह्यांमधील आकड्यांमध्ये मोठी तफावत

पुणे : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पोर्टलवर अद्ययावत करण्यात राज्यभरातील काही जिल्हे पिछाडीवर आहेत. त्यामध्ये सर्वात मागे पुणे जिल्हा असून सुमारे २० हजार रुग्णांची तफावत आढळून येत आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या दोन दिवसांपुर्वीच्या एका परिपत्रकामध्ये सुमारे १ लाख रुग्णांची माहिती अद्ययावत नसल्याची कबुली दिली आहे. हे आकडे अद्ययावत झाल्यास राज्याचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर सध्याच्या ७५ टक्क्यांवरून ८० टक्क्यांच्या पुढे जाईल.
            केंद्र सरकारने देशभरातील प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल व अ‍ॅप तयार केले आहे. प्रत्येक कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयांनी या पोर्टलवर रुग्णांची सर्व माहिती रिअल टाईम अद्ययावत करणे अपेक्षित आहे. या पोर्टलवरील माहितीच केंद्र सरकार व राज्य सरकारकडून अधिकृत मानली जाते. हीच माहिती जगभरात पोहचते. पण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची माहिती अद्ययावत करण्यात हात आखडा घेतला जात असल्याचे चित्र आहे.
         प्रामुख्याने पुण्यासह ठाणे व नागपुर जिल्ह्यांमधील आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसत आहे. पुणे जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरला जिल्ह्यात सुमारे ४२ हजार रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. पण राज्य अहवालात हा आकडा ६२ हजार देण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी हा आकडा ७४ हजारांच्याही पुढे होता. व्यास यांच्या आदेशानंतर त्यात सुधारणा झाल्याचे दिसते. ठाणे जिल्ह्यातही जवळपास ११ हजारांची तफावत दिसून येत आहे. तर नागपुरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण राज्य अहवालात दुपटीने अधिक आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे ९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक, औरंगाबाद, नगर, सांगली यांसह अन्य काही जिल्ह्यांतील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्याही राज्य अहवालात अधिक दिसून येत आहे.
----------------
कोरोनामुक्तीचा दर ८० टक्क्यांच्या पुढे
सर्व जिल्ह्यांनी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची माहिती अचूक नमुद केल्यास राज्याचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर ८० टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो. सध्या राज्य अहवालानुसार हा दर २१ सप्टेंबरला सुमारे ७५ टक्के एवढा होता. राज्य अहवालानुसार राज्यात यादिवसापर्यंत एकुण रुग्णसंख्या १२ लाख २४ हजार झाली असून त्यापैकी सुमारे पावणे तीन लाख रुग्ण उपचार घेत आहेत.
-----------
राज्यातील काही जिल्ह्यांतील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची स्थिती (दि. २१ सप्टेंबर)
जिल्हा                       जि. अहवाल                 राज्य अहवाल
पुणे                            ६२,७८५                      ४२,१८२
ठाणे                           १८,५९८                     २९,७७९
नाशिक                       ९,६२८                       १४,३१२
नागपुर                       ९,४६३                       १८,४९१
औरंगाबाद                   ५,९२०                       ८,७३८
अहमदनगर                 ४,१९७                      ८,५२४
सांगली                       ९,२२३                      १०,६४१ 

Web Title: Corona virus: No 'Update' of corona-free patients across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.