चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 09:49 PM2021-12-26T21:49:08+5:302021-12-26T21:52:13+5:30

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने टेन्शन वाढवलं आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत समोर आले आहेत.

Corona Virus Omicron in Maharashtra 31 new cases in one day 141 infected in the state | चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती

चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती

Next

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने टेन्शन वाढवलं आहे. येथे एकाच दिवसात 31 नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या 31 नव्या प्रकरणांपैकी 27 रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर दोन जण ठाण्यात, 1 जण पुण्यात आणि एक जण अकोल्यात आढळून आला आहे. याच बरोबर आता राज्यातील ओमायक्रॉन बाधितांचा एकूण आकडा 141 वर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 922 नवे रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी, महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत, बीएमसी आयुक्तांनी नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यात खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश आज रात्री 12 वाजल्यापासून लागू झाला आहे. यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये, रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय जिम, स्पा, हॉटेल्स, थिएटर्स आणि सिनेमा हॉलसाठी 50 टक्के क्षमतेचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

लग्नात केवळ 100 लोकांनाच परवानगी -
सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त नसावी आणि खुल्या जागेत ही संख्या 250 पेक्षा अधिक किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के, यांपैकी जे कमी असेल तेवढीच असावी, अशी मार्गदर्शक तत्त्वेही सरकारने जारी केली आहेत. या शिवाय, क्रीडा स्पर्धांदरम्यान क्षमतेच्या केवळ 25 टक्के लोकांनाच भाग घेण्याची परवानगी असेल.

Web Title: Corona Virus Omicron in Maharashtra 31 new cases in one day 141 infected in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.