Corona Virus : महाराष्ट्रात कोरोनाची दहशत, 11000 हून अधिक नवे रुग्ण, 50 Omicron संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 09:47 PM2022-01-02T21:47:19+5:302022-01-02T21:47:44+5:30
Corona Virus Omicron variant : मुंबईत सध्या 9 कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून 203 इमारती सील करण्यात आल्या आहेत. येथे ज्या वेगाने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे, ते पाहता कंटेन्मेंट झोनही वाढतील आणि अनेक इमारतीही सील केल्या जाऊ शकतात.
महाराष्ट्रात रविवारी 11,877 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाल्याने सर्वांचेच टेन्शन वाढले आहे. यांपैकी आज एकट्या मुंबईत 8063 नेवे कोरोना बाधित आढळून आले. तसेच, रविवारी 50 ओमिक्रॉन बाधित रुग्णही आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांचा शनिवारचा आकडा पाहता आज येथे 1,763 रुग्ण अधिक आढलून आले आहेत. मात्र, गेल्या 24 तासांत शहरात एकाचाही संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही आणि 89 टक्के रुग्ण लक्षणे नसलेली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शनिवारी 6,347 संक्रमितांची नोंद झाली आणि रविवारी त्यात 27 टक्क्यांनी वाढ झाली.
510 रुग्ण -
ओमायक्रॉन संसर्गाबद्दल बोलायचे झाल्यास आज राज्यात 50 रुग्णांची नोंद झाली. यांपैकी 38 जणांचा रिपोर्ट इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) आणि 12 जणांचा रिपोर्ट नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS)ने दिला आहे. रिपोर्टनुसार, PMC 36, पिंपरी चिंचवड 8, पुणे ग्रामीण-2, सांगली-2, ठाणे-1, मुंबईमध्ये एका रुग्णाची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण 510 Omicron बाधितांची नोंद झाली आहे.
203 इमारती सील -
सध्या मुंबईत 9 कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून 203 इमारती सील करण्यात आल्या आहेत. येथे ज्या वेगाने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे, ते पाहता कंटेन्मेंट झोनही वाढतील आणि अनेक इमारतीही सील केल्या जाऊ शकतात.