सोसायट्यांनी स्वतः जंतूनाशक फवारणी करू नये; राज्य सरकारचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 07:34 PM2020-03-30T19:34:23+5:302020-03-30T19:34:55+5:30

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे.

Corona Virus Societies should not spray sterilization; State Government Orders | सोसायट्यांनी स्वतः जंतूनाशक फवारणी करू नये; राज्य सरकारचे आदेश

सोसायट्यांनी स्वतः जंतूनाशक फवारणी करू नये; राज्य सरकारचे आदेश

googlenewsNext

मुंबई : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे गावागावांनी, सोसायट्यांनी गेट बंद करून घेतली आहेत. कोरोनाचा रुग्ण येऊ नये म्हणून घरकाम करणारे, पाहुण्यांना बंदी आणण्यात आली आहे. तसेच अनेक सोसायट्या जंतूनाशकांची फवारणी करत आहेत. यावर सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. 


सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास  संबंधित महानगरपालिका प्रत्यक्ष त्या भागाची  तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्वतः फवारणी करेल असे आज कोरोनासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाच्या बैठकीत ठरले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता व वरिष्ठ अधिकारी उपास्थित होते. वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली.

Web Title: Corona Virus Societies should not spray sterilization; State Government Orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.