कोरोनानं पुन्हा वाढवलं मुंबईचं टेन्शन, जंबो कोविड सेंटर्सना अलर्ट राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 09:52 PM2022-06-14T21:52:50+5:302022-06-14T21:55:23+5:30

Corona Virus : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Corona Virus speed increased Corona raises Mumbai tensions again jumbo Covid center on alert mode | कोरोनानं पुन्हा वाढवलं मुंबईचं टेन्शन, जंबो कोविड सेंटर्सना अलर्ट राहण्याचे आदेश

सांकेतिक छायाचित्र

googlenewsNext


महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोजच्या रोज सरासरी एक हजाराहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. आता राज्यात ओमायक्रॉनचे (Omicron) सब-व्हेरिअंट BA.4 आणि BA.5 चे तीन रुग्ण समोर आले आहेत. यातच सरकारने जनतेला मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, परिस्थिती पाहता, पुन्हा एकदा मुंबईमध्ये काही जंबो सेंटर्स अॅक्टिव्ह केले जात आहेत. तसेच या सेंटर्सना अलर्ट मोडवर राहण्यासही सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आकडेवारीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सोमवारी महाराष्ट्रात 1885 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी मुंबईत कोरोनाचे तब्बल 1,118 नवे रुग्ण समोर आले आहेत. 

BA.4 आणि BA.5 चे तिन्ही रुग्ण ठणठणीत -
भारतात आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉनने मोठे नुकसान केले होते. यामुळे, राज्यात ओमायक्रॉनच्या सब व्हेरिअंटचे रुग्ण आढळल्याने सरकार अलर्ट झाले आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, BA.4 आणि BA.5 चे तिन्ही रुग्ण होम आयसोलेशनमध्येच ठणठणीत झाले आहेत. 

जंबो सेंटर्स अॅक्टिव्ह - 
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत जंबो सेंटर्स तयार करण्यात आले होते. यामुळे जनतेला मोठा दिलासाही मिळाला होता. आता मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतानाच, पुन्हा एकदा या जंबो सेंटर्सना अॅक्टिव्ह होण्यास सांगण्यात आले आहे.

ऑक्सिजन टँकही भरण्यात आले - 
मुंबईतील मालाड भागातील जम्बो कोविड सेंटरमध्ये तयारीही सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना मालाड कोविड सेंटरचे डीन म्हणाले, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्हाला अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले आहे. आम्ही ऑक्सिजन सिलिंडर भरले आहेत. जर परिस्थिती बिघडली, तर आम्ही 2 दिवसांत लोकांच्या मदतीसाठी पूर्णपणे तयार राहू. सध्या आमच्याकडे कोविड वॉर रूमसाठी 11 डॉक्टरही आहेत. तसेच, परिस्थिती बिघडलीच तर काही डॉक्टरांना स्टँडबाय देखील ठेवण्यात आले आहे.
 

Web Title: Corona Virus speed increased Corona raises Mumbai tensions again jumbo Covid center on alert mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.