कोरोना पुन्हा दणका देण्याच्या तयारीत? महाराष्ट्रात २४ तासांत २८६ नवे रूग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 11:52 PM2023-03-19T23:52:23+5:302023-03-19T23:55:00+5:30

दिल्लीतही रूग्णसंख्या वाढत असल्याने सतर्क राहण्याचा इशारा

corona virus update 236 new cases in maharashtra in last 24 hours covid 19 news Delhi also on alert mode | कोरोना पुन्हा दणका देण्याच्या तयारीत? महाराष्ट्रात २४ तासांत २८६ नवे रूग्ण

कोरोना पुन्हा दणका देण्याच्या तयारीत? महाराष्ट्रात २४ तासांत २८६ नवे रूग्ण

googlenewsNext

Covid Update in India Maharashtra: H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत राजधानी दिल्लीत 72 आणि महाराष्ट्रात 236 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्ली आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात असे सांगण्यात आले की, कोरोना संसर्गाचा दर 3.95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही राज्यांतील सरकारी यंत्रणांना आणि लोकांना सतर्क राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.

दिल्लीत एकूण 209 सक्रिय प्रकरणे

दिल्लीत गेल्या 24 तासात एकूण 1824 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये कोरोनाचे 72 नवीन रुग्ण आढळून आले असून कोरोना संसर्गाचा दर 3.95 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, 53 रुग्ण बरे झाले आहे. कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. काल म्हणजे 18 मार्च रोजी कोरोनाची 58 नवीन प्रकरणे समोर आली आणि कोरोना संसर्गाचा दर 3.52 टक्क्यांवर पोहोचला. आता दिल्लीत सध्या एकूण 209 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी 130 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि 7 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महाराष्ट्रात 1,308 सक्रिय प्रकरणे

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 3834 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कोरोनाचे 236 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी 92 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आता एकूण 1,308 सक्रिय प्रकरणे आहेत ज्यात मृत्यू दर आणि बरे होण्याचा दर अनुक्रमे 1.82 टक्के आणि 98.16 टक्के आहे. संसर्गाची प्रकरणे 81,39,737 वर पोहोचल्याची माहिती आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारचाही ताण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

महाराष्ट्रातील शहरे- नवीन प्रकरणे

  • मुंबई- 52
  • ठाणे- 33
  • मुंबई उपनगरे- 109
  • पुणे- 69
  • नाशिक- 21
  • कोल्हापूर- 13
  • अकोला- 13
  • औरंगाबाद- 10
  • नागपूर- 2

 

महाराष्ट्रातील कोविड-19ची एकूण आकडेवारी

  • एकूण रूग्ण- 81,39,737
  • मृत्यू- 1,48,428
  • चाचण्या- 8,65,46,719
  • बरे झालेले- 79,90,001

Web Title: corona virus update 236 new cases in maharashtra in last 24 hours covid 19 news Delhi also on alert mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.