Corona Virus: कोरोनाच्या धास्तीनं मंत्रालयासह राज्यातील शासकीय कार्यालय बंद ठेवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:21 PM2020-03-17T12:21:23+5:302020-03-17T12:27:47+5:30

Corona Virus: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा, कॉलेजला सुट्टी दिली आहे. लोकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

Corona Virus: Will Corona's horror keep government offices in the state closed? pnm | Corona Virus: कोरोनाच्या धास्तीनं मंत्रालयासह राज्यातील शासकीय कार्यालय बंद ठेवणार?

Corona Virus: कोरोनाच्या धास्तीनं मंत्रालयासह राज्यातील शासकीय कार्यालय बंद ठेवणार?

googlenewsNext
ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी शासकीय कार्यालयं बंद ठेवण्याचा विचार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात

मुंबई – देशभरात कोरोना व्हायरसचा फैलाव झाला असून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत ३९ कोरोनाच्या रुग्णावर उपचार सुरु आहे. तर यामध्ये एका ६४ वर्षीय रुग्णाचा मुंबईत मृत्यू झाला आहे. राज्य सरकारकडून या आजाराचा सामना करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचं काम सुरु आहे. मात्र दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा, कॉलेजला सुट्टी दिली आहे. लोकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. इतकचं नाही तर मंत्रालयातही सर्वसामान्य लोकांना येण्यास मज्जाव घातला आहे. अशातच मंत्रालयातील एक अधिकारी कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या चाचणीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच या अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी अमेरिकेहून आले होते. ते सर्व कोरोनाग्रस्त निघाले हा अधिकारी सर्वांनाच भेटत होता. त्यामुळे मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा सरकारचा विचार आहे अशी माहिती मिळत आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, शासकीय कार्यालयातील लोकांची गर्दी टाळण्यासाठी सरकार विचार करत आहे. राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. यादृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. याक्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

कोरोनाविरोधात राज्य सरकारने उचलेली पाऊलं

  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव
  • ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.
  • कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.
  • ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.
  • केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.
  • आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.
  • मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.
  •  नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.
  • होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
  • धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.

Web Title: Corona Virus: Will Corona's horror keep government offices in the state closed? pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.