ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव, सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 07:38 AM2020-04-17T07:38:20+5:302020-04-17T07:38:31+5:30
३,२७६ बाधित; सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण
मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाने शिरकाव केल्याने स्थिती गंभीर झाली आहे. आठवड्याभरापूर्वी ११ जिल्ह्यांत संसर्ग पोहोचला नव्हता. आता यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाने शिरकाव केला आहे. राज्यात गुरु वारी रु ग्णांचा आकडा ३ हजार २७६ वर पोहोचला आहे.
राज्यात अजूनही संसर्गाचे समूह संक्रमण नसल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात असला तरीही सध्या राज्यासह मेट्रो शहरांत निदान होणाऱ्या रु ग्णांना प्रवासाचा कोणताही इतिहास नसणे ही बाब गंभीर आहे. याउलट, पॉझिटिव्ह असूनही कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढत आहे. सध्या नंदुरबार, नांदेड, वर्धा, भंडारा, गडचिरोली येथे मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रु ग्ण आढळलेला नाही.
राज्यात गुरु वारी २८६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, एकूण रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात एकूण ३ हजार २७६ कोरोनाचे रु ग्ण झाले असून, गुरु वारी सात मृत्यूंची नोंद झाली आहे. या मृत्यूंपैकी तीन मुंबईतील असून चार पुण्यातील आहेत. याखेरीज, मुंबईत
गुरु वारी १०७ रु ग्णांचे निदान झाले असून, रु ग्णसंख्या २ हजार ७३ वर पोहोचली आहे. तर मुंबईत गुरु वारी तीन मृत्यू झाले असून, बळींची संख्या ११७ झाली आहे. आजपर्यंत राज्यातून ३०० कोरोना रु ग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे.