Coronavirus in kolhapur - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:50 PM2020-04-30T18:50:59+5:302020-04-30T19:07:15+5:30

गेले महिनाभर कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयामध्ये कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र इचलकरंजी येथील कोरोना बाधित वृध्दाचा आज सायंकाळी मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील पहिला बळी आहे. तपासणी सुरू झाल्यापासून बुधवारअखेर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona's first victim in the district | Coronavirus in kolhapur - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

Coronavirus in kolhapur - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

Next
ठळक मुद्देकोरोनाचा जिल्ह््यातील पहिला बळीइचलकरंजीच्या वृध्दाचा सीपीआरमध्ये मृत्यू

कोल्हापूर : गेले महिनाभर कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयामध्ये कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र इचलकरंजी येथील कोरोना बाधित वृध्दाचा आज सायंकाळी मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील पहिला बळी आहे. तपासणी सुरू झाल्यापासून बुधवारअखेर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

६0 वर्षीय या वृध्दास इचलकरंजी येथून दि. २0 एप्रिल रोजी ‘सीपीआर’मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. या वृदधामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना शुक्रवारी, २४ एप्रिल रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अन्य शक्य ते सर्व उपचार त्यांच्यावर करण्यात आले होते. मात्र कोरोना कक्षात गुरुवारी सायंकाळी ४ वाजून २0 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांना त्यांना वाचविण्यात यश आले नाही. औपचारिक बाबींची पूर्तता करुन त्यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

दरम्यान, न्यूमोनिया, हृदयविकार, श्वसनाचा त्रास, अर्धांगवायू, निकामी झालेले फुप्फुस, आदी कारणांनी हे मृत्यू झाले आहेत. दक्षता म्हणून यातील ३० जणांच्या घशातील स्राव घेण्यात आले होते. मात्र, तेदेखील निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले असून एकाचा अहवाल प्रतीक्षेत आहे. ‘सीपीआर’मध्ये ११ मार्चपासून कोरोना संशयित रुग्णांची तपासणी आणि त्यांच्या घशातील स्राव घेण्याचे काम सुरू करण्यात आले.

मृतांचा आकडा यामुळे वाढला

विविध ठिकाणांहून गंभीर झालेले रुग्ण कोरोना संशयित म्हणून सीपीआरकडे पाठवायला सुरुवात झाल्याने गेल्या दोन महिन्यांत हे ३१ रुग्ण दगावल्याचा आकडा दिसत आहे. हृदयविकारापासून अर्धांगवायू झालेले रुग्णही कोरोना संशयित म्हणून ‘सीपीआर’कडे रात्री-अपरात्री पाठविले जाऊ लागले.

समोर अत्यवस्थ असलेला रुग्ण शासकीय रुग्णालय नाकारूच शकत नसल्याने कोणत्याही परिस्थितीत असलेल्या रुग्णाला दाखल करून घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले जात; परंतु सकाळी दाखल झालेला रुग्ण सायंकाळी दगावल्याचेही प्रकार घडले. शेवटच्या टप्प्यातील रुग्ण सीपीआरक डे आल्याने हा मृतांचा आकडा वाढल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Corona's first victim in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.