coronavirus: राज्यात १०२६ नवीन बाधितांची नोंद, एकूण रुग्ण २४,४२७  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:02 AM2020-05-13T07:02:44+5:302020-05-13T07:03:06+5:30

दिवसभरात राज्यात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २९ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. या ५३ मृत्यूंपैकी तब्बल २१ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते.

coronavirus: 1026 new cases reported in the state, total number of patients 24,427 | coronavirus: राज्यात १०२६ नवीन बाधितांची नोंद, एकूण रुग्ण २४,४२७  

coronavirus: राज्यात १०२६ नवीन बाधितांची नोंद, एकूण रुग्ण २४,४२७  

Next

मुंबई : राज्यात मंगळवारी १०२६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांचा एकूण आकडा २४ हजार ४२७ इतका झाला आहे. तर, मंगळवारी दिवसभरात ३३९ तर आतापर्यंत तब्बल ५,१२५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

दिवसभरात राज्यात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २९ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. या ५३ मृत्यूंपैकी तब्बल २१ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते. तर २७ जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. पाच जण ४० वर्षांखालील आहेत. आज ५३ मृतांपैकी ३५ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ९२१ इतकी झाली आहे.  मंगळवारी झालेल्या ५३ मृत्यूंपैकी मुंबईमधील २८, पुण्यात ६, पनवेलमध्ये ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३, ठाण्यात २ आणि रायगड, औरंगाबाद आणि अकोला शहरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या २,२१,६४५ नमुन्यांपैकी १,९५,८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर २४,४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२८९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२,९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी ५४.९२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

एकट्या मुंबईत देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त रुग्ण
नवी दिल्ली : मे महिना आतापर्यंत तरी कोरोनाचा कहर वाढवणारा ठरला आहे. दररोजची रुग्णसंख्या एकदाही तीन हजारांपेक्षा कमी नोंदलेली नाही. सर्वात चिंताजनक म्हणजे देशातील कोणत्याही राज्यापेक्षा एकट्या मुंबईत १५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्र वगळता एकाही राज्याने अद्याप पाच आकडी रुग्णसंख्या गाठलेली नाही. मुंबईतील वाढता आकडा पाहता तेथे
महामारीचा तिसरा टप्पा सुरू झाल्याची भीती आहे.

अमेरिकेत बरे होण्याचे प्रमाण कमीच
रुग्णवाढीचे प्रमाण अमेरिकेत अधिक असले तरी ते बरे होण्याचे प्रमाण अद्याप खूप कमी आहे. तेथील १३ लाख ८८ हजारांपैकी केवळ २ लाख ६२ हजार रुग्णच बरे झाले असून, मृतांची संख्या ८२ हजार आहे. त्या तुलनेत जर्मनी, स्पेन, तुर्कस्थान, इराण आदी देशांत आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

Web Title: coronavirus: 1026 new cases reported in the state, total number of patients 24,427

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.